Praniti Shinde on Corona Vaccine : 'कोरोना व्हॅक्सिनमुळे लोकांना हृदयविकाराचा त्रास सुरु झाला'; प्रणिती शिंदे भाजपवर आक्रमक

विरोधक सध्या इलेक्ट्रॉल बाँडवरुन भाजपला लक्ष्य करत आहेत. अशातच काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी कोरोना लस बनवणाऱ्या सीरम कंपनीवरून गंभीर आरोप केले आहेत.

Praniti Shinde on Corona Vaccine : 'कोरोना व्हॅक्सिनमुळे लोकांना हृदयविकाराचा त्रास सुरु झाला'; प्रणिती शिंदे भाजपवर आक्रमक
Photo Credit - Facebook

Praniti Shinde on Corona Vaccine : लोकसभा निडणूकीच्या तोंडवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी सुरू झाल्या आहेत. आमदार प्रणिती शिंदे यांनी कोविड व्हॅक्सिनवरून भाजवर निशाणा साधला आहे. "कोविड व्हॅक्सिन घेतल्यामुळे ज्यांना काही दुखणे नव्हते अशांना देखील हृदयविकाराचा त्रास सुरु झाला. सरकारने व्हॅक्सिन खरेदी केले होते, त्यामुळे त्यांनी लोकाना जबरदस्ती केली", असा दावा आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. शनिवारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध गावांना आमदार प्रणिती शिंदेनी भेट दिली. त्यावेळी त्यांनी लोकांशी संवाद साधला. याचं दरम्यान इलेकट्रोल बॉण्डच्या मुद्यावरून पंतप्रधान मोदीवर टीका करताना आमदार प्रणिती शिंदेनी सीरम व्हॅक्सीन संदर्भात धक्कादायक विधान केलं. (हेही वाचा:Sushilkumar Shinde, प्रणिती शिंदे यांना भाजपा मध्ये येण्याची ऑफर; सुशील कुमार शिंदेंनी स्वतःच केला गौप्यस्फोट)

कोविड व्हॅक्सिन घेतल्यामुळे ज्यांना काही दुखणे नव्हते अशांना देखील व्याधी सुरू झाल्यात. काहींना हृदयविकाराचा त्रास सुरु झाला. सरकारने व्हॅक्सिन खरेदी केले होते. त्यामुळे त्यांनी लोकाना जबरदस्ती केली, असा दावा आमदार प्रणिती शिंदे यांनी केला आहे. शनिवारी दक्षिण सोलापूर तालुक्यातील विविध गावांना आमदार प्रणिती शिंदेनी भेट देत लोकांशी संवाद साधला. याचं दरम्यान इलेकट्रोल बॉण्डच्या मुद्यावरून पंतप्रधान मोदीवर टीका करताना आमदार प्रणिती शिंदेनी सीरम व्हॅक्सीन संदर्भात धक्कादायक विधान केलं. (हेही वाचा:Rohit Pawar On Praniti Shinde: प्रणिती शिंदेंच्या 'त्या' वक्तव्यावर रोहित पवारांनी दिली प्रतिक्रिया, म्हणाले - त्यांना बोलण्याचा पुर्ण अधिकार)

"सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी स्टेट बँकेवरती ताशेरे ओढले, इलेक्टरोल बॉण्डचा खुलासा करायला सांगितला. यामध्ये ज्या कंपन्यांना मोदींनी टेंडर दिले, त्या कंपन्यांनी मोदींना म्हणजे भाजपाला पैसे दिल्याचे समोर आले. 100 कोटी रुपये दिल्याचे समोर आले आहे. सर्वांना त्या सीरम कंपनीची कोरोना वॅक्सिन जबरदस्तीने दिली," असेही प्रणिती शिंदे म्हणाल्या. " आपल्याला व्हॅक्सिन जबरदस्ती का केलं?, कारण सरकारने व्हॅक्सिन विकत घेतलं. तुमच्या आयुष्यावर पैसे कमवण्यासाठी सरकारने व्हॅक्सिन विकत घेतलं. तुम्हाला त्या व्हॅक्सिनसाठी जबरदस्ती केली," असा आरोप प्रणिती शिंदे यांनी केला.

"त्यामुळे आज कोणाला काही ना काही दुखणे सुरू आहे. ज्यांना काही दुखणे नव्हते अशांना देखील रक्तदाब, मधुमेह, हृदयविकार असे काही ना काही आजार सुरू झालेत. मी तर व्हॅक्सिन घेतलं नाही. सर्टिफिकेटवर मोदींचा फोटो असताना मी कशासाठी घेऊ? आपला एकमेव देश आहे जिथे व्हॅक्सिन सर्टिफिकेटवर मोदींचे फोटो होते, असेही प्रणिती शिंदे म्हणाल्या.

 

(The above story first appeared on LatestLY on Mar 17, 2024 12:00 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).