राज्यभरात उन्हाळ्याच्या तडाख्यासोबतच यंदा वीज दरवाढही जोरदार होणार आहे. वीजदरात 6% वाढ होणार असून हे नवे दर 1 एप्रिल 2019 पासून लागू होणार आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांना वीजदरवाढीचा फटका बसणार आहे. राज्य वीज नियामक आयोगाने सप्टेंबर 2018 मध्ये दिलेल्या आदेशानुसार राज्यभरात वीज दरवाढ होणार आहे.
सप्टेंबर 2018 मध्ये राज्य वीज आयोगाने राज्यातील वीज वितरण कंपन्यांच्या नव्या वीज दरांना मान्यता दिली होती. त्यामुळे महावितरण, अदानी, टाटा पॉवर यांच्या वीजदरात वाढ झाली होती. 1 एप्रिलला तुम्ही Fool's होणार नाही तर खरचं 'या' गोष्टी महागणार, सर्वसामान्यांच्या खिशाला फटका बसणार
महावितरण वीज दर:
# दरमहा 100 युनिट वापर असलेल्या ग्राहकांसाठी वीजदर 5.30 रुपये प्रति युनिट असून यात आता 16 पैशांनी वाढ होणार असून ग्राहकांना प्रति युनिटसाठी 5.46 रुपये मोजावे लागतील.
# तर 101 ते 300 युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या ग्राहकांसाठी वीजदर 15 पैशांनी वाढणार आहे. त्यातच स्थिर आकारात 10 रुपयांनी वाढ होऊन तो 80 वरुन 90 रुपये होणार आहे.
अदानी कंपनी वीजदर:
मुंबई उपनगरात वीजपुरवठा करणारी अदानी कंपनीच्या वीजदरातही वाढ झाली आहे.
# 100 युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या ग्राहकांचा वीजदर 27 पैशांनी वाढून 4.77 रुपये प्रति युनिट होणार आहे.
# 300 युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या ग्राहकांचा वीजदर 26 पैशांनी वाढून 7.90 रुपये प्रति युनिट होणार आहे.
# 300-500 युनिटपर्यंत वीज वापर असलेल्या ग्राहकांचा वीजदर 9.08 रुपयांवरुन 9.29 रुपये प्रति युनिट होणार आहे.
ऐन उन्हाळ्यात आणि निवडणूकीच्या तोंडावर वीज दरवाढ करण्यात आली असून यामुळे सर्वसामन्य नागरिक होरपळून निघणार आहे.