
Mumbai Air Hostess case: मुंबईत पवई परिसरातील 23 वर्षीय ट्रेनी एअर होस्टेस रुपल ओग्रे हीच्या हत्ये प्रकरणी मुंबई पोलीसांनी काही तासांतच आरोपीला अटक केले होते. आरोपी विक्रम अटवालने रुपलच्या हत्ये प्रकरणी पोलीसांत कबुली दिली होती. या हत्याकांड प्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर येत आहे. पोलीस कोठडीत असताना आरोपीने गळफास घेतल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. आरोपीने स्वत:च्या पॅटच्या मदतीने सकाळी साडेसहा वाजता गळफास घेतला आहे. या घटनेमुळे मुंबई शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
अंधेरीतील मरोळ परिसरातील एनजी को-ऑपरेटिव्ह हाउसिंग सोसायटीमध्ये आरोपी विक्रम हाउस कीपिंगची कामं करायचा. मिळालेल्या माहितीनुसार, रुपल सोबत विक्रमचं नेहमी भांडण व्हायचं. या भांडणाच्या रागातून त्याने रुपलचा खून केला. रुपलचा खून करु पसार झाला होता. रुपला धारदार चाकूने वार केला होता. तो चाकू सुध्दा त्याने इमारतीच्या परिसरात टाकला होता.
पोलिस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला गुरुवारी रात्री पोलिस ठाण्यात चौकशीसाठी नेण्यात आले आणि त्यानंतर लॉकअपमध्ये ठेवण्यात आले. पोलीसांनी मिळालेल्या माहितीनुसार रुपला भेटण्यासाठी तीचा मित्र घरी आला होता तेव्हा ही घटना उघडकीस आली. आरोपीला कोठडीत बंद केल्यापासून तो नैराश झाला होता. पोलीसां समोर त्यांनी दोन मुलांचा उल्लेक केला. नैराश्यातून त्याने हे पाऊल उचलल्याचे पोलीसांनी वृत्तांना माहिती दिली. विक्रमने कोठडीत गळफास घेतल्याची माहिती मिळताच त्याचा कुपर रुग्णालयात दाखल केले, परंतु त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टारांनी घोषित केले. त्याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.