Close
Advertisement
 
शनिवार, नोव्हेंबर 16, 2024
ताज्या बातम्या
4 hours ago

Maharashtra Winter Session 2019 Day 5 Live News Updates: यंदाचे हिवाळी अधिवेशन म्हणजे ठाकरे यांचा घरगुती कार्यक्रम, नारायण राणे यांची टीका

महाराष्ट्र Siddhi Shinde | Dec 20, 2019 01:03 PM IST
A+
A-
20 Dec, 13:02 (IST)

हिवाळी अधिवेशनात सुरु असणाऱ्या कामकाजावरून उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळावर  नारायणे राणे यांनी टीकास्त्र सोडले आहे, हे अधिवेशन म्हणजे नुसता घरगुती कार्यक्रम सुरु आहे असे वक्तव्य राणे यांनी माध्यमांसमोर केले.  तर, सरकारला संबोधताना ठाकरे नव्हे तर महाराष्ट्र सरकार म्हणावे अशी सूचना देखील त्यांनी केली. 

20 Dec, 11:56 (IST)

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची सूत्रे हातात घेतल्यावर सर्वात आधी मुंबई मेट्रोच्या आरे कारशेड प्रकल्पावर स्थगिती आणली होती या निर्णयाचा विरोध करत आज विधानसभा हिवाळी अधिवेशनाच्या पाचव्या दिवशी भाजप आमदारांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर आंदोलन पुकारले.  

20 Dec, 11:18 (IST)

महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या  नंतर पहिल्यांदाच विधी मंडळाच्या परिसरात नवनिर्वाचित सर्वपक्षीय आमदारांनी एकत्र फोटोसेशन केले. या कार्यक्रमाला वैयक्तिक कारणांमुळे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस गैरहजर होते.

Nagpur Winter Session 2019 Day 5: महाविकास आघाडी सरकारचे सत्तेत आल्यापासूनचे पहिले अधिवेशन सध्या नागपूर मध्ये सुरू आहे. 16 ते 21 डिसेंबर दरम्यान चालणार्‍या या हिवाळी अधिवेशनाचा आज (20 डिसेंबर ) रोजी पाचवा दिवस आहे. अगोदरच मागील चार दिवसात सुरु असणाऱ्या गदारोळामुळे कोणतेही ठोस निर्णय किंवा काम झालेले नसताना आज कुठेतरी महत्वपूर्ण मुद्द्यांवरून चर्चा होणार असल्याची चिन्हे आहेत. या चर्चेत शेतकरी कर्जमाफीचा मुद्दा समोर येणार असल्याचे संकेत राष्ट्रवादी नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी दिले आहेत तर सध्या नागरिकत्व दुरुस्ती विधयेकावरून पेटलेल्या वादातील महाराष्ट्राची भूमिका आणि राज्यातील सुरक्षा हे देखील वादाचे विषय ठरू शकतात. ('गरीबांना 3 चाकी रिक्षाच परवडते' मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा देवेंद्र फडणवीस यांना टोला)

यंदाच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस 'सावरकरांविरूद्धच्या आक्षेपार्ह विधान'मुळे तर दुसरा दिवस शेतकर्‍यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी गाजवला होता. तर तिसऱ्या दिवशी भाजपा आणि शिवसेना आमदारांमध्ये झालेली धक्काबुक्की लक्षवेधी ठरली. तर काल म्हणजेच 19 डिसेंबर रोजी भाजप सरकारने महाविकास आघाडीला तीन चाकी सरकार म्ह्णून केलेल्या टीकेवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी उत्तर देत आमचे सरकार हे रिक्षेला महत्व देणारे आहे बुलेट ट्रेनला नाही असे म्हणत फडणवीस यांच्या टीकेवर प्रत्युत्तर दिले.

हिवाळी अधिवेशनाचा उद्या शेवटचा दिवस असणार आहे त्यामुळे आज आणि उद्याच्या कामकाजावर सर्वांचे लक्ष लागून आहे


Show Full Article Share Now