महाराष्ट्रात (Maharashtra) महाविकासआघाडीची (Maha vikas Aghadi) सत्ता स्थापन झाल्यानंतर विरोधीपक्षातील नेत्यांकडून या सरकार टिका करण्यात आली होती. यावर मुख्यंमत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी राज्यपालांच्या अभिभाषणावरील चर्चेला उत्तर देत अनेक टिकांना प्रत्यूत्तर दिले आहे. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी महाविकास आघाडीचे सरकार हे ३ चाकी रिक्षा सरकार असल्याचे म्हटले होते. तसेच हे सरकार फार काळ टिकणार नसल्याचे त्यांनी विधान केले होते. देवेद्र फडणवीस यांच्या या विधानावर उद्धव ठाकरे यांनी निशाणा साधला आहे. आमचे सरकार ३ चाकी असले म्हणून काय झाले, गरिबांना रिक्षाच परवडते, असे विधान करुन उद्धव ठाकरे यांनी सर्वांचे लक्ष आपल्याकडे केंद्रीत करुन घेतले आहे.
महाविकास आघाडिचे सरकार स्थापन झाल्यापासून विरोधीपक्षातील अनेक नेत्यांनी या सरकारवर पश्नचिन्ह निर्माण केले आहेत. विधानसभेत उद्धव ठाकरे यांनी अशा प्रश्नाला सडेतोड उत्तर दिले आहेत. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीचे सरकार ३ चाकी आहे. ती धावून धावून किती धावणार, असा चिमटा फडणवीस यांनी काढला होता. यावर मुख्यमंत्री म्हणाले की, "होय, आमचे सरकार 'तीन चाकी' आहे. कारण, गोरगरिबांना ३ चाकी रिक्षाच परवडते. बुलेट ट्रेन परवडत नाही आणि परवडणार नाही." संत तुकडोजी महाराजांची 'पाहुनी सौख्य माझे, देवेंद्र तोही लाजे... शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या... ही कविता ऐकवून मुख्यमंत्र्यांनी फडणवीसांना चिमटा काढला आहे. हे देखील वाचा- Maharashtra Winter Session 2019 Day 4 Live News Updates: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण निराशाजनक; विरोधाकांचा सभात्याग
देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी विधानसभेत सामना वृत्तपत्रातील अग्रलेखावरुन शिवसेनेवर निशाणा साधण्याचा प्रयत्न केला होता. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर सामना वत्तपत्रात आलेल्या टीकेचा दाखले देऊन फडणवीस यांनी शिवसेना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला होता. यावर उत्तर देत उद्धव ठाकरे म्हणाले की, सामना वृत्तपत्राने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे अनेकदा कौतुक केले होते. मात्र, सोयीचे तेवढेच दाखवायचे असे भाजपचे धोरण आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत.