Close
Advertisement
 
सोमवार, डिसेंबर 16, 2024
ताज्या बातम्या
3 minutes ago

Maharashtra Winter Session 2019 Day 4 Live News Updates: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण निराशाजनक; विरोधाकांचा सभात्याग

महाराष्ट्र Dipali Nevarekar | Dec 19, 2019 12:03 PM IST
A+
A-
19 Dec, 12:03 (IST)

  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे भाषण निराशाजनक असल्याचं सांगत  विरोधाकांनी सभात्याग केला आहे. दरम्यान महाविकास आघाडी सरकारने शेतकर्‍यांचा विश्वासघात केला असल्याचं म्हटलं आहे. 

19 Dec, 12:01 (IST)

शेतकर्‍यांना  कर्जमाफी  देण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी 25 हजार रूपये हेक्टरीची मदत देणार असं सांगण्यात आलं होतं मात्र आता त्यांनी मदत का जाहीर केलं नाही? हे सरकार शेतकर्‍यांच्या तोंडाला पानं पुसणारं सरकार आहे. असं म्हटलं आहे.  

19 Dec, 11:43 (IST)

इतर देशातील हिंदू घेणार पण ठेवणार कुठे? नागरिकत्त्व कयद्यावरून  उद्धव ठाकरेंचा सवाल  केला आहे, नागरिकत्त्व कायद्यावरून केंद्र सरकारला प्रश्न विचारला आहे. दरम्यान यावेळेस महाराष्ट्रातील सीमाप्रश्नाकडे लक्ष वेधून घेतले आहे. 

 

19 Dec, 11:30 (IST)

शेतकर्‍यांच्या कर्जमाफीपासून ते बाळासाहेब ठाकरे यांना देण्यात आलेल्या शब्दापर्यंत अनेक गोष्टीवरून मागील काही दिवसांपासून भाजप आक्रमक होऊन महाविकास आघाडीवर टीका केली होती. त्यावर प्रत्युत्तर देताना उद्धव ठाकरे यांनी भाजपाला टोला लगावला आहे. 

19 Dec, 11:21 (IST)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांंच्या भाषणाला सुरूवात झाली आहे. दरम्यान कालच्या टीकेला उत्तर देताना सत्ताबदलाची चाहूल राज्यपालांनीच दिली असून हे सरकार स्थगितीचं नव्हे तर प्रगतीचं असल्याचं सांगत भाषणाला सुरूवात केली आहे.  

19 Dec, 11:03 (IST)

महाराष्ट्र विधिमंडळ अधिवेशनाच्या चौथ्या दिवशी भाजप आक्रमक झाले आहे. समृद्धी महामार्गाला 'बाळासाहेब ठाकरे' यांचं नाव देण्यावरून काही आमदारांनी निषेध नोंदवला आहे.  

19 Dec, 10:47 (IST)

मुख्यमंत्र्यांनी संंमती दिल्यास मंत्रिमंडळ विस्तार केला जाणार आहे. दरम्यान अजित पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, येत्या काही दिवसात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याची माहिती दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संमती दिल्यास 23 डिसेंबरला मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. आज उद्धव ठाकरे - शरद पवार यांची भेट होणार आहे.   

19 Dec, 10:39 (IST)

महाराष्ट्र कॉंग्रेस नेत्यांची आज सभागृहाचे कामकाज सुरू होण्यापूर्वी  विधिमंडळात बैठक  आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीला कॉंग्रेस नेते मलिक्कार्जुन खर्गे यांची उपस्थिती

Nagpur Winter Session 2019 Day 4:  महाविकास आघाडी सरकारचं विधिमंडळ हिवाळी अधिवेशन सध्या नागपूरमध्ये सुरू आहे. 16 डिसेंबर ते 21 डिसेंबर सुरू असणार्‍या या अधिवेशनाचा आज ( 19 डिसेंबर ) हा चौथा दिवस आहे. आजचं विधिमंडळ अधिवेशनचं प्रमुख आकर्षण म्हणजे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज राज्यपालांच्या अभिभाषणाला उत्तर देणार आहेत. काल (18 डिसेंबर) दिवशी विधिमंडळामध्ये विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारवर हल्लाबोल करत महाविकास आघाडीचं सरकार हे हाराकिरीचं सरकार आहे. भाजपाला सर्वाधिक जागा मिळून देखील सरकार स्थापन करू न शकल्याने कॉंग्रेस, राष्ट्रवादी सत्तेत बसले आहेत असे म्हणून त्यांच्या जीवावर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदाच्या खूर्चीत बसले आहेत असे म्हणत टीका केली आहे. त्यामुळे विरोधीपक्ष नेत्याच्या या सार्‍या टीकेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज नेमकं काय उत्तर देणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. Nagpur Winter Session 2019 Day 3: महाविकास आघाडी सरकारमध्ये विसंवाद: देवेंद्र फडणवीस यांचा आरोप.

 दरम्यान काल विधिमंडळामध्ये बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांबद्दल चूकीचे दाखले देत त्यांच्यावर टीका केल्यावरूनही राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार देवेंद्र फडणवीस यांच्यावर तापले होते. मात्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी आमदारांना सबुरीचा सल्ला देत कामकाजाला सहाय्य करण्याचे आवाहन केले आहे.

यंदा विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचे पहिले दोन दिवस विरोधकांच्या आक्रमक पवित्र्यांमुळे विशेष गाजले. त्यानंतर काल विधिमंडळाच्या तिसर्‍या दिवशी सभागृहात नागरिकत्व कायदा, नागपूर महापौर संदीप जोशी यांच्यावरील गोळीबार यावरून विरोधक आणि सत्ताधारी पक्षांमध्ये शाब्दिक चकमक सुरू होती.


Show Full Article Share Now