महाविकास आघाडी सरकारमध्ये विसंवाद असल्याचा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी लावला आहे. दरम्यान राज्यपालांच्या अभिभाषणावर चर्चा करताना शरद पवारांवरील टीकेवर 'सामना' वृत्तपत्रातील लेखांमधून करण्यात आलेल्या भाष्यावरून पुन्हा विधानसभेतील वातावरण तापले आहे. दरम्यान धनंजय मुंडे यांनी याबद्दल आक्षेप नोंदवला आहे.
Nagpur Winter Session 2019 Day 3: महाविकास आघाडी सरकारमध्ये विसंवाद: देवेंद्र फडणवीस यांचा आरोप
Nagpur Winter Session 2019 Day 3: महाविकास आघाडी सरकारचं पहिलं अधिवेशन सध्या नागपूरामध्ये सुरू आहे. 16 ते 21 डिसेंबर दरम्यान चालणार्या या हिवाळी अधिवेशनाचा आज (18 डिसेंबर ) तिसरा दिवस आहे. मागील दोन दिवसांमध्ये गदारोळामुळे दिवसभरासाठी विधानसभेचं कामकाज गुंडाळण्यात आलं होतं. पहिला दिवस 'सावरकरांविरूद्धच्या आक्षेपार्ह विधान'मुळे तर दुसरा दिवस शेतकर्यांच्या प्रश्नावरून विरोधकांनी गाजवला. दरम्यान काल (17 डिसेंबर) हिवाळी अधिवेशनामध्ये भाजपा आणि शिवसेना आमदारामध्ये धक्काबुक्कीदेखील झाली. त्यामुळे आह अधिवेशनाच्या तिसर्या दिवशी विरोधक काय करणार? हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. Nagpur Winter Session 2019: विधिमंडळामध्ये शिवसेना आमदार संजय गायकवाड यांनी म्हणून फाडलं भाजपाचं बॅनर; पहा हाणामारीचं कारण काय?
राज्यात ओला दुष्काळ असल्याने शेतकर्यांना कर्जमाफी द्यावी या मागणीवर विरोधक ठाम आणि आक्रमक आहे. मात्र सरकारकडून कर्जमाफीची घोषणा होणार का? याकडे आता राज्यातील शेतकर्यांचे डोळे लागले आहे. तसेच काल रात्री नागपूर महापौर संदीप जोशी यांच्यावर झालेल्या गोळीबाराचाही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी निषेध नोंदवला आहे.
हिवाळी अधिवेशन मागील दोन दिवसांत केवळ 2 तास 27 मिनिटं सुरू होते.