Maharashtra Legislative Assembly | (Photo Credit : Youtube)

महाराष्ट्रामध्ये यंदा कोविड 19 च्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर यंदा हिवाळी अधिवेशन नाजपूर ऐवजी मुंबई मध्ये होणार आहे. दरम्यान नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या दिवसांमध्ये पुन्हा विधिमंडळ अधिकार्‍यांची बैठक होणार असून त्यानंतर मुंबईत होणार्‍या यंदाच्या हिवाळी अधिवेशनाच्या तारखा ठरवल्या जाणार आहेत. दरम्यान डिसेंबर महिन्यात हे हिवाळी अधिवेशन आयोजित केले जाईल.

यंदा कोरोनाच्या प्रभावामुळेच पावसाळी अधिवेशनदेखील पुरेशी काळजी घेत, आमदारांसह त्यांच्या सचिव आणि अन्य अधिकारी, कर्मचारी यांच्य कोविड टेस्ट करून ते अधिवेशन 2 दिवसांसाठी आयोजित करण्यात आलं होतं.

ANI Tweet

महाराष्ट्रामध्ये नागपूर मध्ये दरवर्षी हिवाळी अधिवेशन आयोजित करण्याची प्रथा आहे. तर उर्वरित 2 अधिवेशनं ही मुंबईतील विधिमंडळात होतात. पण यंदा कोविडचा फैलाव पाहता खबरदारीच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. आता हिवाळी ऐवजी आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन नागपूरमध्ये आयोजित केले जाऊ शकते.