Maharashtra Weather: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात मुसळधार पाऊसाने हजेरी लावली आहे. ह्या मुसळधार पावसाने काही ठिकाणी वाहतूकीवर परिणाम झाला आहे. तर काही ठिकाणी रस्त्यावर पाणी साचलं आहे. महाराष्ट्रात काही ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे झाड पडल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. हवामान खात्याच्या सुत्रानुसार आज महाराष्ट्रात मुसळधार पाऊस पडणार असल्याचे सांगितले आहे. तर कोकण विभात आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊसाची शक्यता असणार आहे.
याचसंदर्भात हवामान खात्याकडून कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात ऑरेंज अर्लट जारी केला आहे.अति मुसळधार पावसांचे ईशारे हवामान खात्याकडून वर्तवले आहेत. मुंबईत देखील पावसाने चांगलीच हजेरी लावली आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आणि वाहतुकीवर परिणाम दिसून आले आहे. वाहतुक ठप्प झाले आहे. ठाण्यात देखील पाण्याचा जोर कायम असल्याचे सांगितले आहे.
पालघर येथे गेले तीन दिवस मुसळधार पाऊस पडत आहे. हवामान खात्याने 30 जून पर्यंत पावसाचे जोर कायम असल्याचे सांगितले जात आहे. भारतीय हवामान खात्याने देशातील अनेक राज्यात मुसळधार पावसाचे जोर कायम असणार आहे असे अंदाज वर्तवला आहे. मुसळधार पावसाने नागरिकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य खबरदारी घेण्यास सांगितले आहे.
कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसामुळे ऑरेंज अर्लट जाहीर केला आहे. आज कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पाऊस असल्याचे हवामान खात्याने सांगितले आहे.