Maharashtra Weather Updates: महाराष्ट्रामध्ये यंदा फेब्रुवारी महिन्यातच मुंबईसह पश्चिम किनारपट्टीवरील नागरिकांना उष्णतेचा त्रास होत आहे. दरम्यान मुंबईसह राज्याच्या वातावरणामध्ये गुरूवार (27 फेब्रुवारी) दिवशी वाढ नोंदवण्यात आली आहे. दरम्यान मुंबई हवामान खात्याकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, पूर्वेकडून वाहणारे वारे, कमी आर्द्रता आणि समुद्रावरून वारे उशिरा येत असल्याने तापमानात वाढ झाली आहे. मुंबईमध्ये काल सांताक्रुझ भागामध्ये 38.4 अंश तापमानाची नोंद करण्यात आली आहे. यंदा फेब्रुवारी महिन्यातच वातावरणात उष्णतेचा पारा दोन वेळेस 38 अंशाच्या पलिकडे गेला आहे. हे मागील 10 वर्षातील तिसर्या क्रमांकाचे कमाल तापमान आहे. मुंबई मध्ये तापमान 38.1 अंशावर, मागील 10 वर्षातील फेब्रुवारी महिन्यातील तिसर्या सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद.
मुंबई शहरामध्ये काल बोरिवली येथे मुंबईतील सर्वाधिक कमाल तापमान नोंदवण्यात आले आहे. बोरिवली येथे कमाल तापमान 38.6 अंश सेल्सिअस इतके होते. मुंबई हवामान खात्याने मात्र आज (28 फेब्रुवारी) पासून वातावरणामध्ये घट होऊ शकते असा अंदाज वर्तवला आहे. Maharashtra Weather Updates: यंदा होळी पुर्वीच राज्यात वाढला उष्णतेचा पारा; अहमदनगर मध्ये कमाल तापमान 36.8 अंशांवर.
Press release by RMC Mumbai on rise in temperatures in the city today pic.twitter.com/BUn7whyGdw
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) February 27, 2020
मुंबई शहरामध्ये आज (28 फेब्रुवारी) कुलाबा येथे कमाल तापमान 35.4 अंश सेल्सियस तर किमान तापमान 20.2 अंश सेल्सियस नोंदवण्यात आले आहे. तर सांताक्रुझमध्ये कमाल तापामान 38.4 अंश आहे आणि किमान तापमान 18 अंश सेल्सियस आहे.