उत्तर भारतामध्ये थंडीचा कडाका असताना मुंबईसह, नवी मुंबई, ठाणे, पालघर भागामध्ये येत्या रविवारी (22 डिसेंबर) दिवशी पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. दरम्यान मुंबईमध्ये माध्यम स्वरूपाचा पाऊस बरसेल अशी माहिती देण्यात आली आहे. तर 23 डिसेंबर पर्यत ढगाळ वातावरणाची शक्यता असल्याचा अंदाजही वर्तवण्यात आला आहे. Multiple Weather Systems सिस्टीममुळे हा पाऊस बारसण्याची शक्यता असल्याचं सांगण्यात आलं आहे. त्यामुळे 22 आणि 23 डिसेंबर दिवशी मुंबई सह नजीकच्या परिसरातील लोकांनी बाहेर पडताना हवामानाचा अंदाज घेऊन बाहेर पडावं असं आवाहन करण्यात आलं आहे.
यंदा गणेशोत्सव, नवरात्री, दिवाळी या सणांमध्येही अवकाळी पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळाला. हा पाऊस कोसळण्यामागे अनेक कारणं आहेत. दरम्यान अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाची शक्यता असल्याचा अंदाज स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज व्यक्त करणाऱ्या वेधशाळेने म्हटले आहे.
ANI Tweet
महाराष्ट्र हवामान अंदाज (१६ ते २२ डिसेंबर), शेतकऱ्यांना सल्ला#Maharashtra #rain #weather #agriculture https://t.co/iYL2JstPf3
— Skymet Marathi (@SkymetMarathi) December 16, 2019
महाराष्ट्रात कोकण, जळगाव, धुळे या भागातही पावावासाची शक्यता आहे. सातारा, सांगली या भागात पावसाची शक्यता नाही. मुंबईमध्ये सामान्यपेक्षा कमी तापमान राहील असा अंदाज आहे. किमान तापमान 21.4 तर कमाल तापमान 34.1 अंश तापमान आहे. यंदाच्या मोसमातील किमान 14 डिसेंबर दिवशी 18 अंश होते.