Mumbai Rains Alert: मुंबई, ठाणे, पुणे शहरात तुरळक पावसाच्या सरी बरण्याची शक्यता; हवामान खात्याचा अंदाज
Monsoon 2019 (Photo Credits: PTI)

हवामान खात्यामध्ये वर्तवलेल्या अंदाजानुसार आज मुंबईसह नजिकच्या परिसरामध्ये तुरळक पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे. काल (21 डिसेंबर) दुपारी 12 वाजेपर्यंत ढगाळ वातावरण होते. तर आज मुंबईसह ठाणे, पालघर, नवी मुंबई या परिसरामध्ये तुरळक सरी बरसू शकतात असा अंदाज हवामान वेधशाळेने वर्तवला आहे. दरम्यान शनिवारी मुंबईतील कुलाबा परिसारत 22 अंश आणि सांताक्रुझमध्ये 21 अंश सेल्सियस पर्यंत तापमान होते. तर आर्द्रतेचे प्रमाणे सुमारे 75 ते 85% इतके नोंदवण्यात आले होते. Maharashtra Weather Updates: मुंबई सह राज्यात येत्या 22, 23 डिसेंबर दिवशी पावसाच्या तुरळक सरी बरसण्याची शक्यता; वेधशाळेचा अंदाज.

हवामान खात्यातील अधिकारी के. एस. होसाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी मुंबईवर ढगांचं आच्छादन होते. त्यामुळे पुढील 24 ते 48 तासांमध्ये मुंबई सह पुणे, सातारा, अहमदनगर या पट्ट्यामध्ये पावसाच्या सरी बरसण्याची शक्यता आहे.

यंदा गणेशोत्सव, नवरात्री, दिवाळी या सणांमध्येही अवकाळी पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळाला. हा पाऊस कोसळण्यामागे अनेक कारणं आहेत. दरम्यान अरबी समुद्रामध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पावसाची शक्यता असल्याचा अंदाज स्कायमेट या खाजगी हवामान अंदाज व्यक्त करणाऱ्या वेधशाळेने म्हटले आहे.