Maharashtra Weather Update: विदर्भ, मराठवाड्यात आज वादळी वाऱ्यांसह तुरळक पावसाची शक्यता
Maharashtra Monsoon 2019 | File Image

Maharashtra Weather Update Today: पावसापासून बऱ्याचदा वंचित राहणारा महाराष्ट्रातील एक भाग म्हणजे विदर्भ (Vidarbha), मराठवाडा (Marathwada). मात्र यंदाच्या पावसाळ्याच्या विदर्भासहित पश्चिम महाराष्ट्राला (Western Maharashtra) देखील भिजवून काढले होते. आता अगदी नवीन वर्षाचा जानेवारी महिना उजाडला तरीही पावसाची शक्यता काही कमी होत नाहीये. आज, 8 जानेवारी रोजी सुद्धा विदर्भ आणि मराठवाडा भागात वादळी वाऱ्यांसहित तुरळक पाऊस पडणार असल्याचा अंदाज आहे. कर्नाटक (Karnatak) आणि तामिळनाडू (Tamilnadu) च्या लगत अरबी समुद्रात (Arabian Sea)  वादळी वारे निर्माण झाल्याने राज्यातील हवामान काहीसे ढगाळ झाले आहे. या वादळी वाऱ्यांचा जोर वाढल्यास काही अंशी पाऊस सुद्धा होऊ शकतो असा अंदाज आहे.फ्लेमिंगो पक्षांचे मुंबईत आगमन: BMC ने शेअर केला फोटो; नयनसुख घेण्यासाठी 'महाराष्ट्र निसर्ग उद्याना'ला भेट द्या.   

हवामान खात्याच्या माहितीनुसार, मागील आठवड्यात सुद्धा नागपूर व लगतच्या काही भागात गारपिटासहित पाऊस पडला होता. गुरुवार (2 जानेवारी) आणि शुक्रवार (3 जानेवारी) रोजी नागपूर मध्ये तब्बल 36.8 MM गोंदिया मध्ये 11.2 MM आणि वर्धा येथे 10.4 MM इतक्या पावसाची नोंद झाली होती. या वातावरणामुळे नागपूर मध्ये संत्री, मोसंबी आणि विदर्भात कापसाच्या शेतीवर मोठा परिणाम झाला आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात थंडीची लाट अद्याप कायम आहे, मुंबई सहित ठाणे जिल्ह्यात काही प्रमाणात या थंडीची तीव्रता कमी असली तरी पुर्णतः थंडी गेलेली नाही. नागपूर, कोल्हापूर व पश्चिम महाराष्ट्र भागात तापमानाचा पारा उतरत चालला आहे. 6 जानेवारी पर्यंत धुळे येथील तापमान हे 7 अंशावर म्हणजेच अगदी निच्चांकी पोहचले होते.