Flamingo Arrive in Mumbai: अनेक दिवसांपासून प्रतीक्षेत असलेले परदेशी पाहुणे अर्थात 'फ्लेमिंगो' (Flamingo Birds) उर्फ रोहित पक्ष्यांचे मुंबईमध्ये आगमन झाले आहे. मुंबई महानगरपालिकेने (BMC) आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून फ्लेमिंगो पक्षाच्या थव्याचा फोटो शेअर केला आहे. दरवर्षी हिवाळ्यात गुलाबी पंख असलेले फ्लेमिंगो पक्षी मुंबईमधील दलदलीच्या भागात स्थलांतर करतात.
फ्लेमिंगो पक्षाचा आकाशातील थव्याचा नयनरम्य फोटो काढल्याबद्दल मुंबई महानगरपालिकेने 'रिफ्लेकशन थ्रू माय लेन्स' आणि 'विद्यासागर हरिहरन' यांचे आभार मानले आहेत. तसेच तुम्हाला नैसर्गिक खजिन्याचा आस्वाद घ्यायचा असेल तर कुटूंबासह 'महाराष्ट्र निसर्ग उद्यान' ला भेट द्या, असंही म्हटलं आहे. (हेही वाचा - कल्याण-खडवली स्थानकात रुळाला तडा गेल्याने मध्य रेल्वे विस्कळीत; मेगाब्लॉक सोबतच वाढीव त्रास)
थंडीची चाहूल लागली की फ्लेमिंगो पक्षी मुंबईत दाखल होतात. लालबुंद चोच, लांबसडक मान, उंच पाय असे त्यांचे लोभस रूप असल्यामुळे त्यांना अग्निपंख असेही म्हटले जाते. या पक्षांचे अनेक थवे सध्या मुंबईमध्ये दाखल होत आहेत. या पक्षांच्या पाण्यामधील शिस्तबद्ध हालचाली पर्यटकांसाठी नेत्रसुखद ठरतात. तसेच भक्ष्य पकडण्यासाठी त्यांनी घेतलेला पवित्रा मनाला मोहून टाकतो.
FEATHER UPDATE! Make way for the Flamingoes! Every winter our pink-feathered friends migrate down to the marshlands of Mumbai. Indeed a spectacle for the bird enthusiasts. Thank you, Reflection thru my lenses & Vidyasagar Hariharan for this beauty.#MyBeautifulMumbaiClicked https://t.co/MYL75RSfVz pic.twitter.com/XPDccykCMH
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) January 4, 2020
मुंबईतील खाडी परीसरात फ्लेमिंगोचे मोठं-मोठे थवे पाहायला मिळतात. पक्षिप्रेमींसह पर्यटकांना फ्लेमिंगो पक्ष्यांचे दर्शन करता यावे, याकरिता मुंबई महापालिकेने याबद्दल मुंबईकरांना आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून माहिती दिली आहे.