Maharashtra Weather Update: मुंबईसह उत्तर महाराष्ट्रात येत्या 2 दिवसांत थंडी वाढणार, तापमानात होणार घट
Cold | Photo Credits: PTI

Maharashtra Weather Update on 9th January: मुंबईत गेल्या 2-3 दिवसांपासून हवेतील गारवा थोडा कमी झाला असून तापमान वाढल्याचे जाणवू लागले होते. मात्र येत्या दोन दिवसांत मुंबईसह उत्तर महाराष्ट्रात तापमानात घट होऊन हवेत गारवा निर्माण होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. 2019 च्या वर्षाअखेरीस मुंबईसह महाराष्ट्रात थंडीचे आगमन झाल्यानंतर पाच दिवसांत थंडीची लाट ओसरून गेली आणि तापमानात वाढ झाली. मात्र येत्या 2 दिवसांत मुंबईतील थंडी वाढणार असल्याचे हवामान विभागाने सांगितले आहे.वाऱ्याची उत्तर-पश्चिम दिशा बदलून दक्षिण-पूर्व झाल्यामुळे रविवारपासून कमाल आणि किमान तापमानात वाढ झाली. त्यामु़ळे कोकण आणि मध्य महाराष्ट्रातदेखील तापमानात वाढ दिसून आली.

राज्यात बुधवारी कमाल आणि किमान तापमानात सर्वत्र वाढ झालेली दिसली. मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झालेली पाहायला मिळत आहे.

स्कायमेट चे ट्विट:

हेदेखील वाचा- Maharashtra Weather Update: विदर्भ, मराठवाड्यात आज वादळी वाऱ्यांसह तुरळक पावसाची शक्यता

मध्य महाराष्ट्रात किमान तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ, तर कोकण आणि विदर्भाच्या काही भागांत सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली. मध्य महाराष्ट्रात किमान तापमान 18 ते 21 अंश सेल्सिअस, मराठवाडा आणि विदर्भात 14 ते 19 अंश सेल्सिअस होते.

विदर्भात हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यताही स्कायमेटने ने वर्तविली आहे. मुंबईत मात्र पावसाची काही लक्षणं नसून येथील हवामान कोरडे राहील. अनेकदा पावसापासून वंचित असलेला विदर्भ मात्र यंदा पावसाने चांगलाच न्हाऊन निघाला आहे. नवीन वर्ष उजाडले तरीही विदर्भात हलक्या स्वरुपाचा पाऊस सुरुच आहे.