संपूर्ण महाराष्ट्र (Maharashtra) थंडीने हुडहुडला असून गेल्या काही दिवसांपासून राज्यात तापमानाचा पारा घसरला आहे. पुणे (Pune), विदर्भ (VIdarbha), नाशिक (Nashik) सह मुंबईने (Mumbai) देखील थंडीची चादर अंथरली आहे असे चित्र निर्माण झाले आहे. मुंबई हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर (K S Hosalikar) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पुण्यात आज तापमान 9.6 अंश सेल्सियस इतके असून नाशिकमध्ये 9.2 इतके झाले आहे. यावरुन महाराष्ट्रातील अनेक महत्त्वाच्या जिल्ह्यात किमान तापमानात किती मोठी घट झाली आहे हे पाहायला मिळत आहे.
के एस होसाळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सांताक्रूज येथे 18 तर कुलाबा येथे 21.2 अंश सेल्सियस इतकी नोंद करण्यात आली आहे. जाणून घेऊयात आज राज्यातील महत्त्वाच्या जिल्ह्यात काय आहे किमान तापमान हेदेखील वाचा- Maharashtra Weather Forecast: पुढील 2 दिवसांत राज्यातील तापमानात घट होण्याची शक्यता- IMD
Min temp today 8 Feb in Maharashtra.Pune finally gets it most awaited single digit min temp:
Slp 14.9 Pune 9.6 Satara 14 MWR 12.4
Baramati 10.1 Nasik 9.2 Jeur 10 Malegaon 9.6
Parbhani 11.3 Nanded 12.2 A'bad 10.5 Jalna 12.4
Scz 18 Col 21.2 Thane 19 Dahanu 16.9 Matheran 17.8 pic.twitter.com/cES0s2GZ3b
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) February 8, 2021
विदर्भातील ब-याचशा भागात आणि मध्य महाराष्ट्रातील तापमान 10 अंश सेल्सिअस इतके झाले आहे. तर मुंबईत तापमान 18 अंश सेल्सियस इतके आहे. येत्या काही दिवसात या तापमानात वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे.
आजच्या तापमानानुसार, नाशिकमध्ये सर्वाधिक कमी तापमानाची नोंद करण्यात आली आहे. त्यापाठोपाठ पुणे, मालेगावमध्ये सर्वात कमी तापमान आहे. तसेच साता-यात 14, परभणी 11.3, बारामती 10.1, नांदेड 12.2, औरंगाबाद 10.5, जालना 12.4 इतकी आजच्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. 7 फेब्रुवारी नंतर शहरातील दिवस आणि रात्रीचे तापमान हळूहळू वाढत जाईल, असेही सांगण्यात आले होते.