Winter | Photo Credits Twitter

गेल्या काही दिवसांपासून राज्यातील तापमानात घट झाली आहे. आज सकाळी महाराष्ट्रात सर्वात कमी तापमानाची नोंद झाली. पुण्यामध्ये पारा 11.3 अंशावर पोहचला होता. येत्या दोन दिवसामध्ये मुंबईमधील थंडीत वाढ होणार आहे. पुढील 48 तासांमध्ये तापमानात अजून घट होण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. याची माहिती मुंबई हवामान विभागाचे उपसंचालक के. एस. होसाळीकर (K. S. Hosalikar) यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. तसंच काळजी घ्या आणि थंडीचा आनंद लूटा असेही त्यांनी सांगितले आहे.

डिसेंबर, जानेवारी महिन्यात राज्यभरात थंडीची तीव्र लाट पसरली होती. फेब्रुवारी महिन्यात थंडीच्या लाट तुलनेने कमी झाली. मात्र आता पुन्हा एकदा तापमानत घट होणार असल्याच अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. (पुण्यात पुन्हा थंडीची लाट; 6 फेब्रुवारी पर्यंत रात्रीच्या तापमानात घट)

K S Hosalikar Tweet:

दरम्यान, पुढील काही दिवस पुणे शहरातील तापमान रात्रीच्या वेळेस अजून काही अंशाने कमी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पुण्यातील तापमान दिवसा 30.1 अंश सेल्सियस तर रात्रीचे तापमान 10.7 अंश सेल्सियस इतके होते. ते 8 अंशापर्यंत जाण्याचा अंदाज होता. मात्र 7 फेब्रुवारी नंतर शहरातील दिवस आणि रात्रीचे तापमान हळूहळू वाढत जाईल, असेही सांगण्यात आले होते.