महाराष्ट्रात उकाडा दिवसेंदिवस वाढत चालला असून नागरिक गरमीने हैराण झाले आहेत. मार्चच्या अखेरीस जो उकाडा सुरु झाला तो दिवसेंदिवस वाढत चालला आहे. मात्र आज सकाळपासून वातावरणात (Maharashtra Weather Update) अचानक गारवा आला. याचे कारण मुंबई हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर (K S Hosalikar) यांनी ट्विटद्वारे सांगितले आहे. आज मुंबई (Mumbai), ठाणेसह (Thane) उत्तर कोकणात किंचितसे ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे वातावरणात अचानक गारवा आलेला जाणवला. आज गुड फ्रायडे ची सुट्टी आणि त्यात वातावरणात आलेल्या गारव्याने नागरिकही सुखावले.
दरम्यान मुंबईत मार्च महिन्यातील सर्वाधिक तापमानाची नोंद करण्यात आली. येथील तापमान 40 अंशावर पोहोचले होते. 27 मार्च रोजी कोकणातील काही शहरांमध्ये तापमान 40 अंश सेल्सियस पर्यत पोहचल्याची माहिती सरकार यांनी दिली आहे. त्यामुळे शक्यतो दुपारच्या सुमारास घरातून बाहेर पडू नका, चेहरा झाकण्यासाठी रुमालाचा वापर करा, भरपूर पाणी प्या असं आवाहन हवामान विभागाकडून देण्यात आले आहे.हेदेखील वाचा- Mumbai Temperature: मुंबईमध्ये उष्णता वाढली; आज 40 अंशापेक्षा जास्त तापमानाची नोंद, उकाड्यामध्ये होणार अजून वाढ
उत्तर कोकणात व मुंबई, ठाणे आकाश किंचीत ढगाळ ☁☁ वातावरण, परीणामी हवेत सुखद गारवा बहुतेक ठिकाणी... pic.twitter.com/sECgLsO8nF
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) April 2, 2021
होसाळीकर यांनी हे देखील सांगितले की, मार्चमधील सर्वाधिक तापमान हे 28 मार्च 1956 रोजी नोंदवण्यात आले होते, ते 41.7 डिग्री सेल्सियस होते. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, गरम व कोरड्या उत्तर पश्चिम वाऱ्यामुळे मुंबईत उष्णता वाढत आहे. हवामान खात्याच्या शास्त्रज्ञ शुभांगी भुते यांच्यामते 15 फेब्रुवारीपासून मुंबईत हवामान बदलण्यास सुरुवात होते. यंदा फेब्रुवारीपर्यंत हवेत गारवा जाणवला होता. त्यानंतर हळूहळू वातावरणात गारवा एकाएकी नाहीसा होऊन तापमान वाढू लागले.