Weather Update : मुंबईकर उकाड्याने हैराण, विदर्भात अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट
Rain | Pixabay.com

Weather Update : बहुतेक सगळ्याच जिल्ह्यांमधून हळूहळू थंडी गायब होत असून उन्हाचा चटका वाढू लागला आहे. किमान आणि कमाल तापमानात वाढ(Weather Update) झाल्याने उकाडाही वाढत आहे. देशभरातील सर्वच प्रमुख शहरांमध्ये तापमानाचा पारा 35 ते 37 अंशाच्या दरम्यान आहे. अशात विदर्भातील काही भागात अवकाळी पाऊस(unseasonal rain) आणि गारपिटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. वर्धा, यवतमाळ, अमरावती, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट (Yellow Alert) जाहीर केला आहे. मराठवाड्यात काही भागात हवामान ढगाळ राहणार आहे. (हेही वाचा : Maharashtra Weather Update : विदर्भात पुन्हा अवकाळी पावसाचे संकट, 'या' जिल्ह्यांमध्ये पडणार पाऊस)

राज्यातील वातावरण गेल्या काही दिवसांपासून सतत बदलत आहे. एकीकडे उन्हाच्या झळा सहन करण्यापलीकडे गेल्या आहेत. तर दुसरीकडे पाऊस पडत आहे. मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्रामध्ये पुढील काही दिवस ढगाळ वातावरण राहणार आहे. 16 ते 19 मार्च या काळात विदर्भात देखील ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. याशिवाय विदर्भाच्या काही भागामध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. (हेही वाचा :Maharashtra Weather: राज्यात 'या' ठिकाणी पावसाचं संकंट, हवामान विभागाने दिला ईशारा )

मध्यंतरी झालेल्या पावसामुळे फळबागांसह रब्बी हंगामातील पिकांची मोठी नासधूस झाली होती. आता हवामान खात्याने पुन्हा एकदा विदर्भात अवकाळी पावसाचा इशारा दिल्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत मोठी वाढ झाली आहे. तसेच कोकणातही काजू, आंब्याच्या बागांवर वातावरणाा परिणाम झाला आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील बदलत्या वातावरणामुळे आजारपणात वाढ झाली आहे. सर्दी, खोकला, ताप यासारख्या संसर्गजन्य आजारांनी नागरिकांना घेरलं आहे. खोकला, सर्दीमुळे नागरिक हैराण झाले आहेत. त्यामुळे बदलत्या वातावरणामुळे काळजी घेणे आवश्यक आहे.