Mumbai Weather Update:  मुंबई शहरामध्ये 26 जानेवारीपासून थंडी परतणार; हवामान खात्याचा अंदाज
Cold wave (Photo Credits: ANI)

Maharashtra Weather Updates: मुंबईसह महाराष्ट्रामध्ये मागील काही दिवसांपासून थंडी जाणवत आहे. मात्र 2-3 दिवसांतच कमाल तापमानामध्ये वाढ झाल्याने मुंबई शहरामधून थंडी पुन्हा गायब झाली आहे. दरम्यान काही दिवसांपूर्वी उत्तरेकडून वाहणार्‍या थंड वार्‍यांमुळे मुंबई, नाशिक, पुणे, नागपूर शहरामध्ये थंडीचं प्रमाण वाढलं होतं. परंतू मुंबई हवामान खात्याने (IMD Mumbai)  वर्तवलेल्या अंदाजानुसार आता 26 जानेवारीपासून पुन्हा महाराष्ट्रात थंडी परतण्याची शक्यता आहे. पुढील काही दिवसांमध्ये मुंबई शहरामध्ये तापमान 15 अंशांच्या खाली जाण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

यंदा मुंबईमध्ये पावसाळा रेंगाळल्यानंतर आता थंडीचं आगमानदेखील लांबणीवर पडलं आहे. मागील वर्षी देखील मार्च महिन्यापर्यंत थंडी अशाचप्रकारे रेंगाळली होती. येत्या काही काळात विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या भागात देखील थंडीचं प्रमाण वाढलं आहे. Mumbai Winter Memes: मुंबईकरांना कुडकुडायला लावणार्‍या थंडीचे सोशल मीडिया मध्ये मिम्स व्हायरल!

हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार 17 जानेवारीच्या सकाळी मुंबई शहरामध्ये 2013 सालानंतर सर्वात कमी तापमानाची नोंद करण्यात आली होती. त्या दिवशी सकाळी तापमान 11 अंशापर्यंत खाली गेल्याने मुंबईकरांना हुडहुडी भरली होती. मागील काही तासांमधेय किमान तापमान 15 अंश तर कोकणकिनारपट्टीवर कमाल तापमान 33.4 (रत्नागिरी), 33.9 (सोलापूर) असं नोंदवण्यात आलं आहे.