Maharashtra Weather Update: विकेंडला राज्याच्या 'या' भागांमध्ये मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता
Monsoon | (Photo Credits: Pixabay.com)

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच राज्यात काही ठिकाणी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यानंतर राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली असून 16-17 ऑक्टोबर रोजी विदर्भ (Vidarbha) आणि संलग्न मराठवाड्यात (Marathwada) मेघगर्जनेसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे विकेंड पावसाचा असणार आहे. दरम्यान, 16 ऑक्टोबर रोजी नागपूरसह अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या जिल्ह्यांना यल्लो अलर्ट (Yellow Alert) देण्यात आला आहे. याशिवाय कोकणात आजही मुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे.

17 ऑक्टोबर, रविवारी नागपूर, अकोला, अमरावती, बुलडाणा, वाशीम, परभणी, नांदेड, हिंगोली, यवतमाळ, लातूर, वर्धा, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया आणि गडचिरोली या पंधरा जिल्ह्यांना येल्लो अलर्ट दिला आहे, अशी माहिती के. एस. होसाळीकर यांनी ट्विटच्या माध्यमातून दिली आहे. (कोकण सह मध्य महाराष्ट्र, गोवा परिसरात पुढील 3 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता)

K S Hosalikar Tweet:

विकेंडला उर्वरीत महाराष्ट्रात कोरड्या हवामानाची शक्यता आहे. तसंच पुढील पाच दिवस मुंबई, पुण्यात कोरड्या हवामानाचा अंदाज असला तरी काही ठिकाणी हलक्या सरी बरसण्याची शक्यता आहे. दरम्यान,  11 ऑक्टोबर पासून राज्यात परतीच्या पावसाला सुरुवात झाली. पूर्व विदर्भाच्या काही भागातून पावसाने परतीच्या प्रवासाला सुरुवात केली आहे.