मान्सून (Monsoon) लवकरच दाखल होण्याच्या बातम्या येऊ लागल्या आहेत. असे असले तरी राज्यावर असलेले अवकाळी पावसाचे (Unseasonal Rain) ढग अद्यापही दूर होण्याची कोणतीच चिन्हे नाहीत. हवामान विभागानेही काहीसा असाच अंदाज (Maharashtra Weather Forecast) व्यक्त केला आहे. हवामान विभागाने (IMD) म्हटले आहे की, राज्यातील बहुतांश भागांमध्ये आज पावसाची शक्यता आहे. राज्यातील वातावरण आज काहीसे संमिश्र राहील. जसे की, काही ठिकाणी पावसाची हजेरी पाहायाल मिळेल तर काही ठिकाणि कडक उन पडू शकते. काही ठिकाणी मात्र हवामान ढगाळ राहील.
राज्यात अनेक ठिकाणी ऋतूबदलास सुरुवात झाली आहे. त्यामुळे काही ठिकाणी ढगाळ वातावरण काही ठिकाणी अगदीच कडक उन्हाचे चटके अनुभवावे लागत आहेत. दरम्यान, मुंबई, कोकण किनारपट्टीलगतच्या भागात हवेतील आर्द्रतेचे प्रमाण कमी जाले नाही. परिणामी नागरिकांना उन्हाच्या तीव्र झळांना सामोरे जावे लागेल. पुढचे 24 तास विदर्भ आणि मराठवाड्यासाठी महत्त्वाचे ठरतील. या विभागांमध्ये पावसाचा जोर पाहायला मिळू शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी आगोदरच आपल्या शेतमालाची काळजी घ्यावी, असे हवामान खात्याने म्हटले आहे. (हेही वाचा, Monsoon Update: मान्सून पुढच्या काहीच दिवसात केरळात, महाराष्ट्रात कधी? कसे असेल राज्यातील हवामान? घ्या जाणून)
राज्यात ऋतूबदलाचे संकेत मिळत असले तरी, राज्यातील तापमानात माीत्र अद्यापही फारसा बदल जाणवत नाही. उन्हाच्या झळा आणि उकाड्याने नागरिकांच्या अंगाची काहीली होते आहे. खास करु पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर आदी ठिकाणी उकाडा कायम आहे. शिवाय ठाणे, मुंबई शहरातील दमट वातावरणातही उकाडा कायम आहे. हिंगोली, भंडारा, गोंदिया, नागपूरसह नजिकच्या भागांमध्ये मात्र, अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. पाऊस पडलेल्या जिल्ह्यांमध्ये आणि भागांमध्ये काहीसा थंडावा अनुभवता येतो आहे.
दरम्यान, भारतीय हवामान खात्याने पुढचे तीन ते चार तासांमध्ये काही राज्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे. यामध्ये राजस्थान, पंजाब, मध्य प्रदेश, जम्मू आणि काश्मीर आणि अंदमान निकोबार बेटांचा समावेश आहे. या राज्यांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असल्याचेही आयएमडीने म्हटले आहे.