महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून पावसाने पूर्णपणे विश्रांती घेतली असून काही भागांत केवळ ढगाळ वातावरण दिसले. हवामान विभागाने (IMD) दिलेल्या ताज्या अपडेट्सनुसार, महाराष्ट्रातील अनेक भागांतून पाऊस माघार घेण्यासाठी आज अनुकूल वातावरण निर्माण झाल्याची शक्यता वर्तविली आहे. त्यासोबतच 28 ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच उद्यापर्यंत पाऊस भारतातूनही परतण्याची शक्यता आहे. हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर (K S Hosalikar) यांनी दिली आहे. ही देशवासियांसाठी दिलासादायक बातमी आहे. परतीच्या पावसाने संपूर्ण महाराष्ट्राला झोडपले असताना पावसाची राज्यातील एक्झिट सर्वांसाठी चांगली गोष्ट आहे.
सणासुदीचे दिवस असताना पावसामुळे आपले नुकसान होणार अशी भीती अनेकांच्या मनात होती. मात्र ही भीती आता काहीशी कमी झाल्याचे दिसून येत आहे. Maharashtra Monsoon Update: दक्षिण कोकणात ढगाळ वातावरण तर मुंबईसह अनेक भागांतून पावसाची माघार- IMD
के एस होसाळीकर यांचे ट्विट
राज्यातील बहुतांश भागातून आज, 27 ऑक्ट, पावसाची परतण्याची शक्यता. परिस्थिती अनुकुल.
28 ऑक्टोबर संपूर्ण देशातून SW Monsoon परतणार व NE Monsoon चे आगमनाची शक्यता.
IMD pic.twitter.com/ScULvHLsdP
— K S Hosalikar (@Hosalikar_KS) October 27, 2020
दरवर्षीच्या तुलनेत यंदा संपूर्ण महाराष्ट्रात अपेक्षेपेक्षा जास्त पाऊस झाला. यामुळे शेतक-यांचे अतोनात नुकसान झाले. तर दुसरीकडे पाणीकपातीचे संकट टळले. यामुळे दुष्काळाची स्थिती नाहीशी झाली. मुंबईला पाणीपुरवठा करणारे धरणं देखील पूर्णपणे भरली असल्याने मुंबईकरांचा जीव भांड्यात पडला आहे.
एकीकडे पावसाची माघार होत असताना आज सकाळपासून मुंबईत थंडीची चाहुल लागल्याचे चित्र पाहायला मिळाले. भांडूप, मुलूंड सह अनेक भागांत आज सकाळी वातावरणात गारवा जाणवला. यंदा पाऊस चांगला झाल्याने राज्यात थंडी देखील चांगलीच पडणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. थंडीचा मोसम हा प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. हवेत आलेला गारवा मन प्रसन्न करणारा असतो. या थंडीने उकाडा कमी जाणवायला लागेल.