Maharashtra Weather Forecast: मुंबई, ठाणे, पालघर, मुंबई, रायगड, धुळेसह आज राज्यभरात 15 जिल्ह्यात पावसाची शक्यता, रब्बी पिकांना फटका बसण्याची चिन्हे
Cloudy Weather | Representational Image (Photo Credits: Pixabay)

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रातील पर्यावरणात बरेच फेरबदल झालेले दिसतात. आजवर अपवादाने घडणाऱ्या गोष्टी घडताना दिसत आहेत. महाराष्ट्र यंदा हिवाळ्यात पाऊस पडताना पाहतो आहे. हवामान इतके बदलले आहे की, राज्यातील सुमारे 15 जिल्ह्यांमध्ये आजही हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस कोसळण्याची शक्यता (Maharashtra Weather Forecast) हवामान विभागाने वर्तवली आहे. प्राप्त माहितीनुसार, ठाणे (Thane), पालघर (Palghar), मुंबई (Mumbai), रायगड (Raigad), धुळे, नंदुरबार, नाशिक, अकोला, अमरावती, भंडारा, बुलडाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ आदी जिल्ह्यांमध्ये पाऊस पडण्याची शक्यता आहे.

अरबी समुद्रात पश्चिम किनारपट्टीवर निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र अद्यापही कायम आहे. त्यामुळे राज्यातील विविध भागात पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवामान विभागाने म्हटले आहे की, राज्यात विविध ठिकाणी आजही वातावरण ढगाळ राहू शकते. काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊसही कोसळू शकतो. त्यामुळे गारठा वाढण्याची शक्यता आहे. (हेदेखील वाचा- Mumbai Rains Update: मुंबई, ठाणे, नवी मुंबईत मध्यरात्रीपासून दमदार पावसाची हजेरी, आजही दिवसभर वातावरण ढगाळ राहण्याची शक्यता- IMD

आज पाऊस पडण्याची शक्यता असलेले जिल्हे

 • ठाणे
 • पालघर
 • मुंबई
 • रायगड
 • धुळे
 • नंदुरबार
 • नाशिक
 • अकोला
 • अमरावती
 • भंडारा
 • बुलडाणा
 • चंद्रपूर
 • गडचिरोली
 • गोंदिया
 • नागपूर
 • वर्धा
 • वाशिम
 • यवतमाळ

दरम्यान, हवामान विभागाने इशारा दिला आहे की, मुंबई, पुणे, ठाणे, पालघरसह इतरही अनेक ठिकाणी वाहन चालकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता आहे. कारण काही ठिकाणी रस्त्यांवर आणि परिसरात धुके साचलेले पाहायला मिळू शकते. दुसऱ्या बाजूला या वातावरणाचा रब्बी पिकांनाही चांगलाच फटका बसण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने फळ आणि भाजीपाला पिकांना या वातावरणाचा मोठा फटका बसू शकतो. नागरिकांनीही या काळा आरोग्याची काळजी घेण्याची शक्यता आहे. काही नागरिकांना सर्दी, खोकला, डोकेदुकी असे त्रास उद्भवू शकतात.