AAP (Photo Credits: Wikimedia Commons)

AAP Maharashtra 2nd List of  Candidates:  महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019 (Maharashtra Vidhan Sabha Elections) च्या तारखांची घोषणा झाल्यानंतर आता सारेच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. यंदा प्रथमच आम आदमी पार्टीदेखील महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीच्या रिंगणात उतरली आहे. आज घटस्थापानेच्या मुहूर्तावर त्यांनी दुसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये त्यांनी 7 उमेदवारांची नावं आहेत. पुणे, ठाणे, सोलापूर, नंदूरबार येथील जागांवर आम आदमी पार्टी आपले उमेदवार उभे करणार आहेत. काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत देण्यात आलेल्या माहितीनुसार आम आदमी पार्टी राज्यात विधानसभा निवडणूकीमध्ये 50 -55 जागांवर निवडणूक लढणार आहे.

आपने महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये वंचित बहुजन आघाडीसोबत युती करण्याबाबत बोलणी सुरु असल्याचेही संकेत पत्रकार परिषदेमध्ये दिले होते. मात्र अद्याप या विषयावर कोणतीही ठोस घोषणा करण्यात आलेली नाही. Maharashtra Assembly Election 2019: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत आम आदमी पक्ष 50 जागा लढणार, यापैंकी 8 उमेदवारांची केली घोषणा.

आम आदमी पार्टीची दुसरी उमेदवारी यादी

1. कैलास फुलारी – जालना (जालना) – मराठवाडा

2. नरेंद्र भांबवानी – मीरा रोड (ठाणे) – कोकण

3. मुकुंद किर्दत – शिवाजी नगर (पुणे) – पश्चिम महाराष्ट्र

4. गणेश धमाले – बडगावंशरी (पुणे) – पश्चिम महाराष्ट्र

5. अॅड. खतीब वकील – मध्य सोलापूर (सोलापूर) – पश्चिम महाराष्ट्र

6. डॉ. सुनील गावित – नवापूर (नंदुरबार) – उत्तर महाराष्ट्र

7. डॉ. अल्तामाश फैजी – मुंब्रा कळवा (ठाणे) – कोकण

आपच्या दुसर्‍या यादीमध्ये जाहीर करण्यात आलेल्या उमेदवारांमध्ये वकिल, पत्रकार, रिक्षाचालक यांचा समावेश आहे. महाराष्ट्रात 21 ऑक्टोबर दिवशी मतदान तर 24 ऑक्टोबर दिवशी मतमोजणी आहे.