महाराष्ट्र अनलॉक 4 (Maharashtra Unlock 04) कालावधी येत्या 30 सप्टेंबरला संपुष्टात येत आहे. त्यामुळे 1 ऑक्टोबरपासून महाराष्ट्र अनलॉक 5 (Maharashtra Unlock 5) लागू होण्याची शक्यता आहे. त्यासोबत नवी मार्गदर्शक तत्त्वेही (Guidelines of Maharashtra Unlock 5) लागू होऊ शकतात. त्यासाठी आज (28 सप्टेंबर) किंवा उद्या (29 सप्टेंबर) घोषणा होऊ शकते. कोरोना व्हायरस संकट (Coronavirus) नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्र सरकारच्या निर्देशानुसार देशभरातील राज्यांनी लॉकडाऊन (Lockdown) लागू केला. दरम्यान काही काळ लॉकडाऊन कायम ठेवल्यानंतर आता लॉकडाऊन शिथिल केला जात आहे. त्यासाठी अनलॉक1,2,3,4 अशा टप्प्याटप्प्याने हटवला जात आहे. अनलॉक 4 मध्ये राज्यातील पर्यायाने देशातील अर्थव्यवस्थेला चालना मिळावी यासाठी अनेक उद्योग, व्यवसाय आणि विविध क्षेत्राला सवलती देण्यात आल्या होत्या. आता अनलॉक 5 मध्ये कोणत्या सवलती मिळतात याबाबत उत्सुकता आहे.
उत्सुकता
ऑक्टोबर महिना हा सबंध देशभरात विविध सण, उत्सव आणि धार्मिक कार्यक्रमांसाठी महत्त्वाचा मानला जातो. त्यामुळे सण, उत्सव साजरे करण्यासठी नागरिकांनी एकत्र यायचे का? आलेच तर किती नागिरकांना एकत्र यायला परवानगी असेल? याबाबत उत्सुकता आहे. केंद्र आणि राज्य सरकारांनी सण उत्सव सार्वजनिक ठिकाणी जाहीरपणे साजरे करण्यास परवानगी द्यावी अशी मागणी वाढत आहे. परंतू, देशातील कोरोना व्हायरस संक्रमितांची वाढती संख्या विचारात घेता सरकार त्यास किती अनुमती देते याबाबत साशंकता आहे. मात्र, मर्यादित स्वरुपात सण उत्सव साजरे करण्यास परवानगी मिळू शकते. (हेही वाचा, Coronavirus Update: भारतात मागील 11 दिवसांत 10 लाख रुग्णांनी केली कोरोनावर मात- आरोग्य मंत्रालय)
कंटेनमेंट झोन परिसरात व्यवाहारांना मान्यता?
अनलॉक4 मध्ये केंद्र सरकारने कंटेनमेंट झोन परिसरा बाहेरील व्यवहारांना सूट दिली होती. या वेळी नियम आणि अटींसह कंटेनमेंट झोन परिसरातही व्यवहारांना मान्यता दिली जाण्याची शक्यता आहे.
मॉल, सलून, रेस्तराँ, व्यायमशाळा प्रत्यक्ष सुरु?
केंद्र सरकारने नियम आणि अटींचे पालन करत मॉल, सलून, रेस्तराँ, व्यायमशाळा सुरु करण्यास या आधीच परवानगी दिली नाही. परंतू, राज्यातील वाढता कोरोना व्हायरस संसर्ग पाहता मॉल, सलून, रेस्तराँ, व्यायमशाळा आदी अद्याप सुरु नाहीत. त्यामुळे अनलॉक 5 मध्ये मॉल, सलून, रेस्तराँ, व्यायमशाळा, चित्रपटगृहे, जलतरण तलाव, मनोरंजन पार्क प्रत्यक्ष सुरु करण्यास परवानगी दिली जाण्याची शक्यता आहे.
धार्मिक स्थळं, पर्यटन स्थळं खुली?
अनलॉक 4 मध्ये अनेक उद्योग व्यवसाय सुरु करण्यास मान्यता दिली असली तरी, मान्यता अद्यापही धार्मिक स्थळं, पर्यटनस्थळांना ही सवलत मिळाली नाही. अनलॉक 5 मध्ये धार्मिक स्थळं, पर्यटन, सार्वजनिक वाहतूक नियम आणि अटींचे पालन करत खुली केली जाण्याची शक्यता आहे.
दरम्यान, सद्यास्थितीत सार्वजनिक वाहतूक सुविधा मर्यादित स्वरुपात सुरु आहे. आंतरजिल्हा एसटी वाहतूकही सुरु आहे. परंतू, मुंबई लोकल, रेल्वे, बेस्ट बसेस अद्यापही सुरु नाहीत. ज्या सुरु आहेत त्या केवळ अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांसठी. त्यामुळे अनलॉक 5 मध्ये सरकार याबाबत काय निर्णय घेते याकडे सर्वसामान्यांचे डोळे लागले आहेत.