भारतामध्ये कोरोना विषाणूचा (Coronavirus) प्रादुर्भाव सुरु झाल्यावर केंद्र सरकारने लॉक डाऊनची (Lockdown) घोषणा केली होती. या दरम्यान सर्व उद्योग, वाहतूक, व्यवसाय, आस्थापना बंद ठेवण्यात आल्या होत्या. त्यानंतर अनलॉकच्या (Unlock) माधमातून सरकारने हळहळू देशात विविध गोष्टी सुरु केल्या. नुकतेच केंद्र सरकरने अनलॉक 4 (Unlock 4) च्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. आता महाराष्ट्र सरकारने ही लॉक डाऊनमध्ये शिथिलता आणत टप्प्याटप्प्याने काही गोष्टी सुरु होत असल्याची माहिती दिली आहे. यामध्ये सर्वात महत्वाचे म्हणजे, 100% क्षमतेने हॉटेल्स आणि लॉज चालवण्याची परवानगी दिली गेली आहे. यासाठी स्वतंत्र एसओपी असेल व या आस्थापनांचे संचालन करताना आवश्यक खबरदारी घ्यावी असे सांगण्यात आले आहे.
महाराष्ट्र सरकारने अन लॉकमध्ये खालील नियम जारी केले आहेत -
-
- मुंबई आणि एमएमआरमध्ये शासकीय कार्यालय 30 टक्के क्षमतेने सुरु राहणार आहेत. तर, उर्वरित महाराष्ट्रात सरकारी कार्यालयात 50 टक्के कर्मचाऱ्यांच्या उपस्थिती काम सुरू करता येणार आहे. मात्र, सोशल डिस्टनसिंग आणि मास्क वापरणे बंधनकारक आहे.
- यामध्ये मानदंड सुनिश्चित करण्यासाठी प्रत्येक कार्यालयात दक्षता अधिकारी नेमला जाईल. कोविड-19 चा प्रसार टाळण्यासाठी सामाजिक अंतर, मास्क चा वापर इ. नियम पाळले जातील. पुढे, प्रत्येक कार्यालय आवश्यकतेने सुसज्ज असेल याची खात्री केली जाईल.
- सर्व खाजगी कार्यालये आवश्यकतेनुसार 30% पर्यंत कार्य करू शकतात.
- आंतरराज्यीय आणि राज्यांतर्गत व्यक्ती आणि वस्तूंच्या हालचालींवर कोणतेही बंधन असणार नाही. अशा हालचालींसाठी स्वतंत्र परवानगी/मान्यता/ई-परमिटची आवश्यकता नाही.
Easing of Restrictions and Phase-wise opening of Lockdown. (1/3)#MissionBeginAgain pic.twitter.com/2tgFa8poco
— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) August 31, 2020
- प्रवासी खासगी बस, मिनी बस किंवा तत्सम वाहने प्रवास करू शकतात.
- शाळा, महाविद्यालये, चित्रपटगृहे, थिएटर, कोचिंग क्लासेस, जलतरण तलाव, बार, प्रेक्षागृह 30 सप्टेंबरपर्यंत बंद राहतील.
- प्रवाशांचा आंतरराष्ट्रीय हवाई प्रवास (सरकारच्या परवानगीशिवाय) साठी परवानगी नसेल.
- सामाजिक, शैक्षणिक, क्रीडा संबंधित, करमणुकीशी संबंधित, सांस्कृतिक आणि धार्मिक मेळाव्यास परवानगी नसेल.
- सार्वजनिक कार्यक्रमांत केवळ 50 नागरिकांना एकत्र येण्याची परवानगी मिळाली आहे. पण यावेळी फिजिकल डिस्टंसिंगचे नियम पाळावे लागणार आहेत.
- प्रवास करताना चालकासह टॅक्सीत चार तर रिक्षामध्ये तीन प्रवाशांना मुभा असेल.
- मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन दररोज 200 उड्डाणांना परवानगी देण्यात आली आहे. उद्यापासून 100 विमाने जाणार व 100 येणार. यापूर्वी आतापर्यंत करोना संकटामुळे हा आकडा 50-50 असा होता. (हेही वाचा: केंद्र सरकारने जारी केल्या अनलॉक 4 च्या मार्गदर्शक सूचना; मेट्रो सेवा 7 सप्टेंबरपासून सुरू, 100 लोकांसह सामाजिक, राजकीय व धार्मिक कार्यक्रमांना परवानगी)अशाप्रकारे महाराष्ट्र सरकारने आता लॉक डाऊनमध्ये बऱ्यापैकी शिथिलता आणली आहे. महत्वाचे म्हणजे सरकारने अजूनही मेट्रो, रेल्वे, जिम व मंदिरे यांच्याबाबत अजूनही काही निर्णय घेतला नाही.