सांगलीत ATM मशीन फोडण्यासाठी चोरांनी वापरले बुलडोझर; लोक म्हणाले, 'Money Heist 2023'
Thieves used bulldozers to break ATM machine (PC - Twitter)

Thieves Used Bulldozers to Break ATM Machine: चोर पैसे चोरण्यासाठी कोणत्या थराला जाऊ शकतात, याचे उदाहरण महाराष्ट्रातील सांगलीत पाहायला मिळाले. येथे चोरट्यांनी बुलडोझर (Bulldozer) चा (जेसीबी मशिन) वापर करून बुथमधील एटीएम मशीन (ATM Machine) बाहेर काढले.

रविवारी घडलेली ही घटना एटीएम बूथमध्ये बसवण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून ती आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केली जात आहे. काही सोशल मीडिया वापरकर्ते चोरांच्या धाडसावर हसत आहेत, तर काहीजण बेरोजगारीला दोष देत आहेत. (हेही वाचा - महाराष्ट्रातील 'या' शहरात पेट्रोल मिळतंय 1 रुपया लिटरने; पेट्रोल भरण्यासाठी नागरिकांनी लावल्या लांबचं-लांब रांगा)

हे प्रकरण सांगली जिल्ह्यातील मिरज तालुक्यातील आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, चोरट्यांनी आधी एक जेसीबी चोरला आणि नंतर त्याच मशीनने अॅक्सिस बँकेचे एटीएम खोदले. मिळालेल्या माहितीनुसार, एटीएम मशिनमध्ये 27,00,000 रुपये होते. एटीएम मशीनच्या बाहेर सीसीटीव्ही आणि गार्ड नव्हता. एटीएम मशीन फोडून चोरट्यांनी त्याला काही अंतरावर नेले.

पहा व्हायरल व्हिडिओ -

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओवर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. फेसबुकवर एका युजरने कमेंट केली, "इंडिया गॉट टैलेंट" तर दुसर्‍याने लिहिले की, क्रिप्टो मायनिंगच्या जमान्यात एटीएम मायनिंगचा एक नवीन शोध लागला आहे. दुसर्‍या वापरकर्त्याने लिहिले आहे, हे "मनी हाइस्ट 2023 आहे का?"