प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

ठाणे (Thane) येथे शनिवारी एका 44 वर्षीय व्यक्तीचा मृत देह सापडल्याने घबराट पसरली होती. तर नित्यानंद पांडे असे या व्यक्तीचे नाव असून ते एका मासिकाचे संपादक आहेत. तर हत्या केल्यानंतर पांडे यांचा मृतदेह भिवंडी येथील पुलाखाली फेकण्यात आला असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

पांडे यांच्या शरीरावर गंभीर जखमा दिसून आल्या असून त्यांची हत्या केल्याचे उघडकीस आले आहे. तर पांडे यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. पांडे यांच्या घरातील मंडळींनी ते हरविले असल्याची तक्रार पोलिसात दाखल केली होती. तसेच शुक्रवारी संध्याकाळी 7.30 वाजताच्या सुमारापासून त्यांचा मोबाईल बंद असल्याचे सांगण्यात येत होतेय तसेच पांडे हत्येपूर्वी मित्रासोबत होते. पोलिसांनी तपास करुन तो मृतदेह पांडे यांचाच असल्याचे त्यांच्या घरातील मंडळींना सांगितले आहे.

ANI ट्वीट:

इंडिया अनबाऊंड (India unbound) या मासिकाचे पांडे संपादक होते. त्याचसोबत पांडे यांचे अंधेरी आणि मीरा रोड येथे ऑफिस आहे. या मासिकात सरकारी अधिकाऱ्यांच्या मुलाखती छापून येतात. तर पांडे यांच्याविरुद्ध मिरा रोड येथे अनेक गुन्हे दाखल असल्याचे इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या वृत्तात दिले आहे. तर पांडे यांची हत्या वैयक्तिक वादामुळे करण्यात आली असल्याचा पोलिसांना संशय असल्याचे म्हटले आहे. परंतु अद्याप या संशयाची अधिकृत पुष्टी करण्यात आलेली नाही.