Maharashtra Weather Update: महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून उकाडा चांगलाच वाढला असून या उकाड्याने घराबाहेर असलेल्या नागरिकांची अंगाची लाही लाही होत आहे. मुंबईसह (Mumbai), नाशिक (Nashik), ठाणे (Thane), कोल्हापूरात (Kolhapur) तापमान चांगलेच वाढल्याची माहिती मुंबई हवामान विभागाचे उपसंचालक के एस होसाळीकर (K S Hosalikar) यांनी दिली आहे. मुंबईत आजचे तापमान 22 अंश सेल्सियसवर पोहोचले असून राज्यात सर्वाधिक कमाल तापमना हरनाई (Harnai) जिल्ह्यात आहे. हरनाई जिल्ह्यात आजचे तापमान 25.3 अंश सेल्सियस इतके आहे.
महिन्याभरापूर्वी महाराष्ट्रात थंडीची लाट पसरली होती. तर काही जिल्ह्यात पावसाची शक्यता देखील व्यक्त करण्यात आली होती. मात्र मार्च महिन्याच्या सुरुवातीपासून थंडी एकाएकी गायब झाली असून उन्हाचा पारा वाढला आहे.
जाणून घेऊन राज्यातील आजचे तापमान (17 मार्च)
मुंबई- 22
परभणी- 21.5
सातारा- 19
रत्नागिरी- 23.5
नांदेड- 20.1
पुणे- 17.1
नाशिक- 19
डहाणू- 22.5
सांगली- 20.9
बीड- 22.4
जालना- 21.5
बारामती- 17.3
IMD ने दिलेल्या रिपोर्टनुसार, पुण्यात सर्वाधिक कमी तापमान आहे. हरनाईपाठोपाठ रत्नागिरी, डहाणू, माथेरानमध्ये सर्वात जास्त तापमान आहे.
महिन्याभरापूर्वी पुण्याचे तापमान 9.6 अंश सेल्सियस इतके असून नाशिकमध्ये 9.2 इतके झाले होते. मे महिन्यात राज्यात उन्हाचा पारा आणखीनच वाढणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. गेल्या वर्षी स्कायमेट वेदर (Skymet Weather) या हवामानाचा अंदाज वर्तवणाऱ्या खाजगी संस्थेतर्फे देशातील सर्वात उष्ण 10 शहरांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातील तीन शहरांचा समावेश होता. विदर्भातील अकोला (Akola), नागपूर (Nagpur) आणि चंद्रपूर (Chandrapur) ही तीन सर्वात अधिक तापमान असणारी शहरे होती. या भागात 47 अंशाहून अधिक तापमानाची नोंद झाली आहे.