महाविकास आघाडी सरकार मधील जलसंपदा मंत्री (Water Resources Minister) आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना कोरोनाची लागण झाली आहे. आज त्यांनी सोशल मीडियामध्ये ट्वीट करत ते कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे. दरम्यान प्रकृती उत्तम असून व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारा ते कामकाज सुरू ठेवणार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. 'माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मात्र तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती करतो.' असे त्यांचे ट्वीट आहे. नक्की वाचा: अन्न व औषध प्रशासन मंत्री Dr. Rajendra Shingne कोरोना पॉझिटिव्ह.
जयंत पाटील यांचा दोन दिवसांपूर्वीच बर्थ डे सेलिब्रेट झाला. त्यापूर्वी ते पक्षाच्या राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेदरम्यान महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमध्ये दौरे करत फिरत होते.
जयंत पाटील यांचं ट्वीट
माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली आहे मात्र तब्येत उत्तम आहे, काळजी करण्यासारखे काही नाही. डॉक्टरांचा योग्य सल्ला घेत आहे, लवकरच प्रत्यक्षात आपल्या सेवेत रुजू होईल. आपण माझ्या संपर्कात आले असल्यास, आपली कोरोना चाचणी करून घ्यावी अशी विनंती करतो.
— Jayant Patil (@Jayant_R_Patil) February 18, 2021
जयंत पाटील यांच्यापूर्वी दोन दिवस आधी राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे हे देखील कोरोनाग्रस्त झाले आहे. या दोघांपूर्वी महाविकास आघाडीच्या सरकारमधील 18 मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. काही दिवसांपूर्वीच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यांनी या आजारावर मात केली आहे. सध्या ते होम क्वारंटाईन आहेत. मागील वर्षभरापासून कोरोनाची अवघं जग सामना करत आहे. आता पुन्हा राज्यात कोरोना रूग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना पाहायला मिळाली आहे.