Dr. Rajendra Shingne (PC -Twitter)

महाराष्ट्राचे अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे (Dr. Rajendra Shingne) यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी ट्वीट करत याची माहिती दिली आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. दरम्यान मागील काही दिवसांमध्ये राज्यात पुन्हा कोरोना पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या वाढत असल्याचं पहायला मिळालं आहे. त्यामुळे नागरिकांनी काळजी घेण्याचं, मास्कचा वापर, हात सॅनिटाईज करणं आणि सोशल डिस्टन्सिंग पाळणं हे नियम पुन्हा काटेकोर पणे पाळा अन्यथा आपण पुन्हा लॉकडाऊन कडे जाऊ असं सांग़ण्यात आले आहे. Gujarat CM Vijay Rupani यांना Covid 19 ची लागण; सौम्य लक्षणं, प्रकृती स्थिर.

राजेंद्र शिंगणे यांनी ट्वीट करत- 'आज माझी कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली असून माझी प्रकृती उत्तम आहे. तरी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांनी कोरोना चाचणी करून घ्यावी, असे मी आवाहन करतो. लवकरच मी कोरोनावर मात करून पुन्हा आपल्या सेवेसाठी हजर होईल.' असं म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वीच राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनादेखील कोरोनाची लागण झाल्याचं त्यांनी म्हटलं होतं. सध्या ते कोरोनामुक्त असून 8 दिवस होम क्वारंटाईन आहेत.

राजेंद्र शिंगणे पोस्ट

मागील वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा धुमाकूळ सुरू झाला. यामध्ये आतापर्यंत महाविकास आघाडी सरकार मधील 18 मंत्र्यांना कोरोनाची लागण झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे या सार्‍यांनीच कोरोनावर मात करून पुन्हा कामाला सुरूवात केली आहे.

कोरोना संकटकाळात राजेंद्र शिंगणे हे रस्त्यावर उतरून कोरोना औषधं, मास्क आणि इंजेक्शनचा काळाबाजार करणार्‍यांचा पर्दाफाश करताना दिसले आहेत. त्यांनी अनेक ठिकाणी धडक कारवाई करत नियम मोडणार्‍यांना अद्दल घडवल्याचं पहायला मिळालं आहे.