E-rickshaw | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

थंड हेवेचे ठिकाण आणि पर्यटनस्थळ अशी ओळख असलेल्या माथेरानमध्ये आता ई-रिक्षा (E-rickshaw) धावातना दिसणार आहेत. राज्य सरकारने ई-रिक्षा चाचणी घेण्यासाठी माथेरान पालिकेला (Matheran Municipality) आदेश (Maharashtra State Government) दिले आहेत. ही चाचणी यशस्वी होताच बहुचर्चित इलेक्ट्रिक रिक्षा माथेरानच्या टेकड्यांवर आणि रत्यांवर धावताना दिसणार आहेत. तिनचाकी रिक्षा प्रवाशांना घेऊन माथेरनाच्या टेकड्या आणि डोंगराळ प्रदेशात वेगावर नियंत्रण ठेऊन धावण्यास सक्षम आहेत किंवा नाही याबाबत या चाचण्यांमध्ये अभ्यास केला जाईल.

महाराष्ट्र सरकारच्या नगरविकास विभागाने हिरवा कंदील दाखवल्याने चाचणी यशस्वी झाल्यास माथेरान महापालिका ई-रिक्षा खरेदी करणार आहे. नेरळ ते माथेरान दरम्यान असलेल्या डोंगर उताराच्या रस्त्यांवर या रिक्षा कशा चालतात. त्यांचा प्रतिसाद कसा मिळतो याचा तांत्रिक अभ्यास करण्यासाठी ही चाचणी घेण्यात येत आहे.

सुप्रीम कोर्टाने गेल्या महिन्यात महाराष्ट्राला माथेरान इको-सेन्सिटिव्ह झोनमध्ये प्रायोगिक तत्त्वावर पर्यावरणपूरक ई-रिक्षा सुरू करण्याची परवानगी दिली होती. जेणेकरून त्या परिसरात चालणाऱ्या हाताने ओढलेल्या रिक्षांच्या जागी त्यांची व्यवहार्यता तपासावी. माथेरानमध्ये ब्रिटीश काळापासून हिल स्टेशन कारला परवानगी देत ​​​​नाही, लोकांना एकतर चालत जावे लागते किंवा वाहतुकीसाठी उपलब्ध असलेल्या 460 घोड्यांपैकी एक किंवा हाताने ओढलेल्या 94 रिक्षांचा वापर करावा लागतो.