Farmer | Phto Credits: PTI

महाराष्ट्रामध्ये लॉकडाऊनला आता वर्षभराचा काळ लोटला आहे. मागील वर्षामध्ये महावितरण कडून वाढीव वीज बिल पाठवण्यावरून मोठा गदारोळ झाला आहे. सामान्य ग्राहकांसोबत शेतकरी देखील या वीजबीलांमध्ये सूट मिळावी या प्रतिक्षेमध्ये होते. मात्र सध्या शेतकर्‍यांनी सप्टेंबर 2020 पर्यंतच्या वीजबिलात 50% दिलेल्या सवलतीचा फायदा घेत ते लवकरात लवकर भरावे असे आवाहन करण्यात आले आहे. शेतकर्‍यांना हे वीज बिल भरण्यासाठी मार्च अखेरीपर्यंतचा वेळ असल्याचं सांगितलं जात आहे.

दरम्यान सकाळ च्या वृत्तानुसार, सातारा मध्ये महावितरण चे कार्यकारी अभियंता अभिमन्यू राख यांनी नुकतीच शेतकर्‍यांची भेट घेतली आहे. शेतीपंपाच्या वीज बिला संदर्भात शेतकर्‍यांशी ते बोलत होते तेव्हा त्यांनी चालू मुदतीमध्ये वीज बिल न भरल्यास वीज कनेक्शन कापले जाईल असे सांगण्यात आले आहे. यावेळेस त्यांनी शेतकर्‍यांच्या सोयीनुसार महावितरणाचे अधिकारी येऊन बिलं दुरूस्त करतील असे देखील सांगण्यात आले आहे.

महावितरणाच्या माहितीनुसार, सप्टेंबर 2020 पर्यंतच्या वीज बिलाला 50% सूट देण्याची योजना ही 2023 सालपर्यंत चालू राहणार आहे. त्यामुळे या सवलतीचा फायदा घेण्यासाठी शेतकर्‍यांनी मार्च महिन्याच्या अखेरीपर्यंत बिल भरण्याचं आवाहन केले आहे.

यंदा महाराष्ट्र राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये वीज बिल वेळेत न भरल्यास कनेक्शन कापले जाणार नाही असे स्पष्ट केले होते पण नंतर महावितरणाला होणारा तोटा पाहता वीज कनेक्शन तोडण्याच्या कारवाईला सुरूवात केली आहे.