
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ (MSBSHSE) महाराष्ट्र बोर्डाचा SSC परीक्षा 2023 म्हणजेच इयत्ता दहावीचा निकाल पुढच्या अवघ्या काही दिवसांमध्ये अथवा तासांमध्ये जाहीर होऊ शकतो. हा निकाल जाहीर झाल्यानंतर तो MSBSHSE च्या अधिकृत वेबसाइट Mahahsscboard.in आणि mahresult.nic.in वर पाहायला मिळू शकतो. अर्थात शिक्षण मंडळाकडून निकाल जाहीर होण्याबाबत तारीख, वेळ याबाबत कोणतीही माहिती जाहीर करण्यात आली नाही. मात्र, हा निकाल जाहीर झाल्यानंतर तो शक्य तितक्या तातडीने कुठे आणि कसा पाहता येईल याबाबतचा आवश्यक तपशील आपण येथे जाणून घेऊ शकता.
कसा पाहाल निकाल?
- सर्वात आधी Mahahsscboard.in किंवा mahresult.nic.in या संकेतस्थळांना भेट द्या.
- संकेतस्थळावर जाताच इयत्ता दहावीच्या निकालाच्या लिंकवर क्लिक करा.
- तिथल्या बॉक्समध्ये तुमचा आनसन क्रमांक टाका.
- तुमच्या आईच्या नावाची पहिली तीन अक्षरे लिहा.
- SSC चा निकाल 2023 स्क्रीनवर दिसेल.
- निकालाची प्रिंट काढा किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा.
Digilocker वरही आपण पाहू शकता इयत्ता दहावीचा निकाल, कसा पाहाल?
- DigiLocker अॅप उघडा किंवा digilocker.gov.in वर लॉग इन करा.
- आवश्यक तपशील सबमिट करून नवीन नोंदणी करा. तुम्ही आधीच नोंदणीकृत असल्यास तुमच्या खात्यात लॉग इन करा.
- 'MSBSHSE SSC निकाल 2023' वर क्लिक करा.
- महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल मिळविण्यासाठी आधार कार्ड तपशील प्रविष्ट करा.
- निकालाची प्रिंट काढा किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा.
यावर्षी, महाराष्ट्र बोर्ड एसएससी परीक्षा 2023 साठी 15,77,256 विद्यार्थ्यांनी नावनोंदणी केली. ज्यामध्ये 8,44,116 मुले आणि 7,33,067 मुलींनी परीक्षा दिली. या सर्वच विद्यार्थ्यांना, त्याचे पालक आणि शक्षकांना निकालाबाबत उत्सुकता आहे.