Maharashtra SSC Result 2021 Website Down: 5 तास उलटले, दहावी निकालाच्या दोन्ही वेबसाईट्स अद्यापही बंदच!
Results (Archived, edited, representative images)

Maharashtra SSC Result 2021 Website Down: महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे सन 2021 मध्ये अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे हा निकाल तयार करण्यात आला आहे. मात्र, निकाल लागून पाच तास उलटले तरी, दोन्ही वेबसाईट अद्यापही सुरु झाल्या नाहीत. एकाच वेळी अनेक जणांनी ही वेबसाईट उघडण्याचा प्रयत्न केल्यामुळे दोन्ही वेबसाईट क्रश झाल्याचे सांगितले जात आहे. दहावीच्या निकालाची वेबसाईट सुरु करण्यासाठी एसएससी बोर्डाचे प्रयत्न सुरु आहेत. बोर्डाचे अध्यक्ष दिनकर पाटील आणि तांत्रिक सदस्यांची बैठक सुरु झाली आहे.

दहावीच्या निकालाच्या दोन्ही वेबसाईट तब्बल 5 तासांहून अधिक वेळ झाला तरी डाऊनच आहेत. निकालाच्या वेबसाईट कधी पूर्ववत होणार? याकडे विद्यार्थ्यांसह पालकांचे लक्ष लागले आहे. एकाच वेळी अनेक जणांनी ही वेबसाईट उघडण्याचा प्रयत्न केला. ज्यामुळे दोन्ही वेबसाईट क्रश झाली आहे. या सर्व तांत्रिक बिघाडाची चौकशीचेही शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी निर्देश दिले आहेत. तसेच लवकरच दहावी निकालाचे संकेतस्थळ पुर्ववत सुरू होऊन विद्यार्थ्यांना त्यांचा निकाल बघता येईल असा दिलासा त्यांनी दिला आहे. हे देखील वाचा- SSC Results 2021: निकालाची वेबसाईटच नाही तर ठाकरे सरकारही हँग झालंय; अतुल भातखळकर यांचा टोला

महाराष्ट्रातील 22,767 शाळांतून 16 लाख 58 हजार 614 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी 22 हजार 384 शाळांचा निकाल 100 टक्के लागला आहे. सन 2021 चा नियमित विद्यार्थ्यांचा निकाल मार्च 2020 च्या निकालाच्या तुलनेत 4.65 टक्के जास्त आहे. यावर्षीचा दहावीचा निकाल ऐतिहासिक निकाल म्हणून पाहिला जात आहे. कारण, पहिल्यांदाच दहावीचा निकाल अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे जाहीर करण्यात येणार आहे. याचबरोबर सर्वाधिक विद्यार्थी या वर्षी उतीर्ण झाले आहेत.