Maharashtra SSC Exam Update : विद्यार्थ्यांसाठी दिलासादायक बातमी! दहावी बोर्ड परीक्षा अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ; 'ही' आहे अंतिम तारीख
Exams | Representational Image (Photo Credits: Getty Images)

कोरोना व्हायरसमुळे (Coronavirus) शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यात आता 2020-21 च्या वार्षिक परीक्षा देखील जवळ येऊन ठेपल्या आहेत. त्यात दहावी बोर्ड परीक्षेसाठी (Maharashtra SSC Exam) अर्ज भरण्याची प्रक्रिया देखील सुरु आहे. ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख 11 जानेवारी ही होती. मात्र तारखेत मुदतवाढ करण्यात आली असून 25 जानेवारी ही अर्ज भरण्याची अंतिम तारीख ठेवण्यात आली आहे. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये आणि फॉर्म न भरता आल्याने त्यांचे वर्ष वाया जाऊ नये यासाठी हा महत्त्वाचा निर्णय शिक्षण मंडळाने घेतला आहे.

दहावी बोर्ड परीक्षेचा अर्ज भरण्याची अंतिम तारीख वाढविण्यामागचे आणखी एक कारण म्हणजे हे ऑनलाईन अर्ज भरताना विद्यार्थ्यांना अनेक तांत्रिक अडचणी येत होत्या. त्यात आज हे अर्ज भरण्याची शेवटची तारीख होती. त्यामुळे अनेक विद्यार्थी चिंतेत होते. अनेक विद्यार्थी एकावेळेस अर्ज भरत असल्याने सकाळी 10 वाजेपासून वेबसाईट हँग झाली होती. त्यात अनेक विद्यार्थ्यांना अर्ज भरणे कठीण झाले होते. आज अर्ज भरण्याची शेवटची तारीख असल्याने विद्यार्थी, पालक ,मुंबई मुख्यध्यापक संघटना यांनी बोर्डाने अर्ज भरण्यासाठी मुदतवाढ देण्याची मागणी पत्राद्वारे केली होती.हेदेखील वाचा- MPSC 2020 Exam Revised Dates: राज्य सेवा पूर्व परीक्षा 2020 यंदा 14 मार्च ला; इथे पहा संपूर्ण वेळापत्रक

या सर्व बाबींचा विचार करुन बोर्डाने तांत्रिक अडचणी दूर करण्याचा प्रयत्न सुरू असून लवकर दूर केल्या जातील शिवाय मुदतवाढ बाबत अजून विचार झाला नसल्याचं सांगितलं होतं. मात्र अखेर शिक्षण मंडळाने सर्व बाजूंचा साराचार विचार करुन अर्ज भरण्याची अंतिम तारीख वाढवून ती 25 जानेवारी ठेवली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी कोणतीही चिंता न करता ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज व्यवस्थित भरावा असे आवाहन देखील करण्यात आले आहे.

दरम्यान एमपीएससी परीक्षेच्या वेळापत्रकातही बदल करण्यात आले असून राज्य सेवा पूर्व परीक्षांचे नवे वेळापत्रक बनविण्यात आले आहे. येत्या 23 मार्च ही परीक्षा होणार आहे.