Maharashtra SSC Board Result 2021: महाराष्ट्र स्टेट बोर्ड ऑफ सेकेंडरी अॅन्ड हायर सेकेंडरी एज्युकेशन (MSBSHSE) कडून आज दुपारी 1 वाजता 10 वी बोर्डचा निकाल जाहीर केला जाणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांसह पालकांमध्ये निकालाबद्दल उत्सुकतेसह एक चिंता सुद्धा असणार आहे. परंतु निकाल पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी शिक्षणमंडळाची अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in आणि mahahsscboard.in येथे भेट द्यावी. या ठिकाणी 1 वाजता निकाल पाहता येणार आहे. विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी आपला आसन क्रमांक आणि आपल्या पालकांचे नाव दाखल करावे लागणार आहे. तर 10 वी बोर्ड परिक्षेसाठी 15 लाख विद्यार्थ्यांनी रजिस्ट्रेशन केले होते. मात्र कोरोना व्हायरसच्या परिस्थितीमुळे परीक्षा रद्द करण्यात आली होती.
10 वी बोर्ड परिक्षेचा निकाल हा इयत्ता 9 वी चे गुण आणि 10 वी मधील परफॉर्मन्सच्या आधारावर लागणार आहे. एकूण 100 गुणांपैकी 50 गुण 9 वी च्या आधारावर असणार आहेत. तर 10 वी चे 30 गुण हे आंतरिक मूल्यांकानसह 20 गुण हे होमवर्क आणि प्रोजेक्ट्सच्या आधारावर दिले जाणार आहेत. दहावी बोर्डाच्या निकालाबद्दल राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ट्विट करत सांगितले होते. Maharashtra SSC Result 2021: 10वीचा निकाल जाहीर; mahahsscboard.in वर तुमचे मार्क्स कसे पहाल ऑनलाईन?
Tweet:
एकूण आठ माध्यमानुसार सन २०२०-२१ वर्षातील एसएससी (इ. १० वी ) परीक्षेला एकूण १६ लाख ५८ हजार ६२४ विद्यार्थी बसल्याची नोंद झालेली आहे. यापैकी ९ लाख ०९ हजार ९३१ मुलं असून मुलींची संख्या ७ लाख ४८ हजार ६९३ एवढी आहे. pic.twitter.com/5gdZnAGwKe
— Varsha Gaikwad (@VarshaEGaikwad) July 15, 2021
दरम्यान, 10 वी च्या निकालानंतर बोर्डाकडून एका सीईटी परीक्षेच्या आधारे 11 वीचे प्रवेश दिले जातील. ही परीक्षा वैकल्पिक असणार आहे. तर अंतर्गत मूल्यमापनाने लावण्यात आलेल्या निकालावर खूष नसणार्यांसाठी बोर्डाकडून काही इतर पर्याय देखील समोर ठेवले जाणार आहेत.