महाराष्ट्रातील नागपूर (Nagpur) जिल्ह्यात एका 11 वर्षीय मुलीवर एकाच महिन्यात अनेक वेळा सामूहिक बलात्कार (Gang Rape) झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात पोलिसांनी नऊ जणांना अटक केली आहे, एका अधिकाऱ्याने याबाबत बुधवारी माहिती दिली. 19 जून ते 15 जुलै दरम्यान नागपूर शहरापासून 60 किलोमीटर अंतरावर असलेल्या गावात या मुलीवर अनेकवेळा बाकात्काराच्या या घटना घडल्या. या प्रकरणी- रोशन करगावकर (29) आणि त्याचे मित्र/परिचित- गजानन मुरस्कर (40), प्रेमदास (38), राकेश महाकाळकर (24), गोविंदा नाटे (22), सौरभ उर्फ करण रिठे (22), नितेश (30), प्रद्युम्ना करूटकर (22) आणि निखिल उर्फ पिंकू नरुळे (24) अशा आरोपींना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडितेचे आई-वडील मजूर असून, करगावकर हा अल्पवयीन मुलीच्या शेजारी राहतो. 19 जून रोजी करगावकर मुलीच्या घरी गेला होता, त्यावेळी त्याने तिला आपल्यासोबत त्याच्या घरी येण्यास सांगितले. त्यानुसार ती त्याच्यासोबत त्याच्या घरी गेली. तिथे त्याने आणि त्याचा मित्र मुरस्करने तिच्यावर बलात्कार केला. त्यांनी तिला काही पैसे दिले आणि याबाबत कोणालाही काही सांगू नको अशी धमकी दिली.
काही दिवसांनी करगावकर याच्या घरी आणखी तिघांनी या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला. 15 जुलै रोजी मुरस्कर, गाठीबांधे आणि त्यांच्या दोन मित्रांनी मुलीला धमकावले. त्यावेळी इतर कोणीतरी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. पोलिसांना काही काळानंतर या घटनांबद्दल माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी पीडितेकडे याची चौकशी केली. त्यावेळी तिने पोलिसांना व तिच्या आई-वडिलांना घडलेल्या घटनेबद्दल माहिती दिली. (हेही वाचा: Mumbai Crime: धक्कादायक! 13 वर्षीय अल्पवयीन मुलावर लैंगिक अत्याचार)
त्यानंतर पोलिसांनी आरोपींना ताब्यात घेऊन त्यांच्यावर, भारतीय दंड संहिता (IPC) कलम 376 (d) (गँगरेप), 376 (2) (n) (एकाच महिलेवर वारंवार बलात्कार करणे), 506 (गुन्हेगारी धमकी) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून मुलांचे संरक्षण (POCSO) कायद्यांतर्गत गुन्हा नोंदवले गेले.