Maharashtra: केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या विरोधात केलेल्या विधानानंतर शिवसैनिक आक्रमक झाल्याचे दिसून आले. त्यांनी ठिकठिकाणी भाजपच्या कार्यालयाची तोडफोड सुद्धा केल्याचे दिसून आले. यामुळे भाजप कार्यकर्ते आणि शिवसैनिक एकमेकांना भिडल्याचे दिसून आले. याच पार्श्वभूमीवर भाजप आणि शिवसेनेकडून तीन गुन्हे आणि एक गुन्हा पोलिसांकडून दाखल करण्यात आले.
कार्यालयाच्या तोडफोडीप्रकरणी दहा संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याचसोबत नाशिकमध्ये ज्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे त्याचा शोध आता पोलिसांकडून घेतला जात आहे. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनी अधिक स्पष्ट केले आहे.(केंद्रीय मंत्र्याला अटक करुन काय पराक्रम केला? नारायण राणे यांचा हल्लाबोल)
संजय राऊत यांनी असे म्हटले की,ज्या फरार कार्यकर्त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहेत ते आज निवासस्थानी येऊन भेटले. या कार्यकर्त्यांच्या अटकपूर्व जामीनासाठी आम्ही प्रयत्न करत असल्याचे ही संजय राउत यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.(नारायण राणे यांची छत्रपती संभाजी महाराजांशी तुलना; शिवसेना आमदाराची भाजप नेत्याविरोधात पोलीस ठाण्यात तक्रार)
दरम्यान, नारायण राणे यांच्यावर सुद्धा संजय राऊत यांनी आज पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. त्यावेळी राऊत म्हणाले की, भाजपमध्ये बाहेर आलेल्या लोकांनी उच्छाद मांडला आहे. त्याचसोबत महाराष्ट्राचे पश्चिम बंगाल होऊ देणार नाही या विधानावरुन राऊत यांनी विधान करत म्हटले की, राणे यांनी पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्राचा अपमान केला आहे. त्यांनी आधी इतिसाह वाचावा त्यानंतरच विधाने करावीत.