Nagpur Dairy Products Seller (Photo Credits-ANI)

कोरोना व्हायरसने देशभरासह महाराष्ट्रात थैमान घातल्याने रुग्णंच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे सरकारने लॉकडाउनचे आदेश पुढील काही दिवस कायम राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे लॉकडाउनचा फटका सर्व क्षेत्रांसह लहान उद्योगधंद्यांना सुद्धा बसला आहे. उद्योगधंदे पूर्णपणे बंद असल्याने कामगार वर्गाने आपल्या घरी जाण्याची वाट पकडली होती. मात्र राज्य सरकारने स्थलांतरित कामगारांना राज्य सोडून जाऊ नसे असे आवाहन केले होते. याच पार्श्वभुमीवर नागपूर (Nagpur) येथील एका डेअरी प्रोडक्ट्स विक्रेत्याचे लॉकडाउनमुळे 90 टक्के नुकसान झाले आहे. त्याचसोबत 200 किलोपर्यंत पनीर फेकून देण्याची पाळी त्याच्यावर ओढावल्याचे विक्रेत्याने म्हटले आहे.

डेअरी विक्रेत्याने असे म्हटले आहे की, कोरोनामुळे लॉकडाउनचे आदेश सरकारने जाहीर केले आहेत. त्यामुळे डेअरीचा धंदा मंदावला असून त्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. जवळजवळ 90 टक्के नुकसान झाल्याचे विक्रेत्याने म्हटले आहे. त्याचसोबत 2-3 दिवसात 150 ते 200 किलो पनीर असाच फेकून द्यावा लागत असल्याची ही त्याने सांगितले. मात्र आता पनीर जास्त करुन कोणीही खरेदी करत नसल्याने त्याचे उत्पादन सुद्धा घटवणार असल्याचे विक्रेता रोशन गुप्ता याने स्पष्ट केले आहे. (Lockdown मध्ये बाहेर फिरताना रोखल्याने तिघांनी मिळून पोलिसांवरच केला हल्ला; पिंपरी- चिंचवड मधील धक्कादायक प्रकार)

दरम्यान, कोरोना व्हायरसमुळे अनेक कामकाज ठप्प झाले आहेत. मात्र स्थलांतरित कामगारांसाठी आता त्यांना त्यांच्या राज्यात पाठवण्यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. तसेच कोरोनाबाधित रुग्णांवर डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांकडून अहोरात्र उपचार केले जात आहेत. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाच्या विरोधात लढायचे असल्यास घरातच थांबावे आणि नियमांचे पालन करावे असे आवाहन वारंवार करण्यात येत आहे.