Maharashtra School Reopen: राज्यातील शाळा पुन्हा सुरु करण्यासंदर्भातील निर्णय विचारपूर्वक - राजेश टोपे
Rajesh Tope | (Photo Credits: Facebook)

Maharashtra School Reopen: राज्यातील 12 वी चे वर्ग सुरु करण्याचा निर्णय हा विचारपूर्वक घेण्यात आल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी म्हटले आहे. गेल्या महिन्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ झाल्याने शाळा बंद करण्यात आल्या होत्या. जालना येथील पत्रकारांशी रविवारी बोलताना टोपे यांनी असे म्हटले की, शाळा सुरु करणे अत्यंत गरजेचे आहे. कारण मुलांच्या बुद्धिला चालना मिळेल आणि त्यांना अधिक काळ घरात ठेवणे योग्य नाही आहे.

मध्येच शाळा सुरु करणे धोकादायक असल्याने सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासह यामुळे मुलांना या धोक्यापासून दूर ठेवण्याचा विचार केला. आम्ही कोरोनाच्या नियमांचे पालन आणि सुविधेनासुर निर्णय घेतल्याचे राजेश टोपे यांनी म्हटले आहे. तसेच पालकांनी आपल्या मुलांना शाळेत पाठवावे असे आवाहन ही त्यांनी केले आहे.(Maharashtra: कोरोनाच्या परिस्थितीत मुलांना शाळेत पाठवणे धोकादायक, राज्यातील 62 टक्के पालकांचे म्हणणे- सर्वे)

दरम्यान, गेल्या काही दिवसात कोरोनाच्या रुग्णांचा आकडा वाढला आहे. 90-95 टक्के ऑक्सिजन आणि आयसीयू बेड हे रिक्त असल्याची माहिती देत टोपे यांनी पुढे असे म्हटले की, अशाच प्रकारे अधिक रुग्ण हॉस्पिटलमध्ये भरती न झाल्यास नियमात शिथीलता आणली जाईल. मंत्र्यांनी असे ही म्हटले की, 90 टक्के नागरिकांनी कोरोनाच्या लसीचा पहिला डोस घेतला आहे. तर दुसरा डोस घेतलेल्यांची टक्केवारी ही 62-32 टक्के ऐवढी आहे. परंतु काही नागरिकांनी कोरोनाच्या लसीचा दुसरा डोस घेण्यास पुढे येत नाही आहेत. मात्र आरोग्य कर्मचाऱ्यांकडून नागरिकांना लसीचा डोस घेण्यासाठी प्रोत्साहन केले जात आहे.