Maharashtra: कोरोनाच्या परिस्थितीत मुलांना शाळेत पाठवणे धोकादायक, राज्यातील 62 टक्के पालकांचे म्हणणे- सर्वे
Image Used For Representation (Photo Credits: Facebook)

Maharashtra: राज्यभरातील शाळा सोमवारपासून (24 जानेवारी) सुरु होणार आहेत. परंतु राज्यातील फक्त 11 टक्के पालकांनी ऑनलाईन पद्धतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणाच्या माध्यमातून आपल्या पाल्याला शाळेत पाठवण्यासाठी सहमती दर्शवली आहे. ऑक्टोंबर ते डिसेंबरच्या काळात मुले शाळेत पुन्हा परतल्याने उपस्थितीचा आकडा 96 टक्क्यांनी वाढला. परंतु ओमिक्रॉनच्या रुग्णांचा आकडा वाढला गेला तेव्हा परत शाळा बंद करण्यात आला. त्यानुसार इयत्ता 1-9 वी आणि 11 वी चे वर्ग ऑनलाईन पद्धतीने पुन्हा भरु लागले. मात्र राज्य सरकारने गुरुवारी जाहीर करत शाळा सुरु करण्यास परवानगी दिली.

स्थानिक लोक, सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून 36 जिल्ह्यातील 4975 पालकांमध्ये हे सर्वेक्षण करण्यात आले. त्यानुसार 62 टक्के पालकांनी त्यांच्या पाल्याला शाळेत पाठवण्याबद्दल असहमती दर्शवली आहे. पालकांना आपल्या मुलांना शाळेत पाठवण्यापूर्वी कोरोनाचा पॉझिटिव्ह रेट हा 5 टक्क्यांनी खाली किंवा कमी व्हावा असे वाटत असल्याचे चेअरपर्सन आणि फाउंडर सचिन तपरिया यांनी म्हटले आहे. तर जवळजवळ यामध्ये 67 टक्के पुरुषांनी सहभाग घेतला. टियर 1 शहरात 44 टक्के जणांचा समावेश, 2 टियरमध्ये 31 टक्के आणि 3,4 मध्ये 25 टक्के जणांचा सहभाग होता.(Corona Vaccination Update: मुंबईत आता दोन सत्रात राबवणार लसीकरण, नवीन वेळापत्रक पुढील आठवड्यापासून होणार लागू)

परंतु 16 टक्क्यांहून अधिक पालक आपल्या पाल्याला शाळेत पाठवत आहे. तर 10-12 वी इयत्तेतील विद्यार्थ्यांचे ते पालक असून रुग्णांचा आकडा जरी वाढत असेल तरीही त्यांना फिजिकली पाठवणे पसंद करत आहेत. पण काही पालकांमध्ये आपल्या मुलाला शाळेत पाठवावे की नाही याबद्दल संभ्रम निर्माण झाला आहे. ओमिक्रॉनच्या रुग्णांचा एका बाजूला वाढत असून दुसऱ्या बाजूला  मुलांच्या लसीकरणावर ही जोर दिला जात आहे. दरम्यान. मुंबई आणि ठाणे येथील शाळा सोमवार पासून ऑफलाईन पद्धतीने सुरु केल्या जाणार आहेत. तर पालघर जिल्ह्यातील 8-12 वी चे वर्ग 27 जानेवारी पासून सुरु होणार आहेत. महाविद्यालय आणि युनिव्हर्सिटी संदर्भातील निर्णय लवकरच घेण्यात येणार आहे.