Maharashtra: औरंगाबाद (Aurangabad) मधील सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील (Siddharth Garden and Zoo) समृद्धी नावाच्या वाघिणीने 5 बछड्यांना (Cubs) जन्म दिला आहे. तर या बछड्यांनी प्रकृती उत्तम असून त्यांना पशुवैद्यकांच्या माध्यमातून त्यांची काळजी घेतली जाणार आहे. तसेच सध्याच्या थंडीच्या वातावरणापासून त्यांचा बचाव करण्यासाठी हिटरची सोय सुद्धा केली गेली आहे. या नवजात बछड्यांसह वाघिणीची काळजी घेण्यासाठी ही खास सुविधा करण्यात आली आहे.(Tejas Thackeray Discovers New Snakehead Species: तेजस ठाकरे यांचे नवे संशोधन, मेघालय East Khasi Hills येथे शोधला दुर्मिळ चन्ना स्नेकडेड)
समृद्धी वाघणिने 5 बछड्यांना जन्म दिल्यानंतर सिद्धार्थ उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात वाघांचा आकडा 14 वर पोहचला आहे. तसेच वाघिणीसह बछड्यांवर लक्ष ठेवण्यासाठी सीसीटिव्ही कॅमेरा ही लावण्यात आला आहे. ऐवढेच नाही तर तिच्या सेवेसाठी 24 तास केअरटेकर ही असणार असून फक्त त्यालाच तेथे जाण्याची परवानगी असणार आहे.(Tejas Thackeray Discovered a New Fish Hiranyakeshi: तेजस ठाकरे यांनी शोधला नवा मासा, नाव ठेवलं 'हिरण्यकेशी)
Tweet:
Maharashtra: Samrudhi, a tigress gave birth to five cubs at Siddharth Garden and Zoo of Aurangabad, yesterday. pic.twitter.com/vwzZ9A85zl
— ANI (@ANI) December 26, 2020
वाघिणीने 5 बछड्यांना जन्म दिल्याने आनंद व्यक्त केला जात आहे.याआधी वाघिणीने 2019 मध्ये 4 बछड्यांना जन्म दिला होता. तर सध्या कोरोना व्हायरसमुळे हे प्राणिसंग्रहालय बंद असले तरीही पर्यटकांसाठी ही खुशखबर आहे.