महाराष्ट्र: ग्रामीण भागात COVID19 चा आकडा वाढत असल्याने आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी व्यक्त केली चिंता
Health Minister Rajesh Tope | (Photo Credits: ANI)

महाराष्ट्रातील ग्रामीण भागात कोरोना व्हायरसच्या (Coronavirus) रुग्णांची वाढती संख्या पाहता राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी चिंता व्यक्त केली आहे. तसेच मुंबईहून मोठ्या प्रमाणात नागरिक हे ग्रामीण भागात आल्याने या रुग्णांची संख्या वाढल्याचे ही टोपे यांनी स्पष्ट केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात स्वातंत्र्य दिनानिमित्तच्या कार्यक्रमात बोलताना टोपे यांनी असे म्हटले आहे की, कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असला तरीही राज्यात रुग्णांचा रिकव्हरी रेट सुद्धा अधिक आहे.(Balasaheb Patil: महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री बाळासाहेब पाटील यांना कोरोना विषाणूची लागण)

जालना येथे कोरोनाबाधितांचा आकडा 3 हजारांवर पोहचला आहे. त्यापैकी 2 हजारांहून अधिक रुग्णांची प्रकृती सुधारली आहे. राजेश टोपे हे जालन्याचे पालकमंत्री सुद्धा आहेत. ग्रामीण भागात मुंबईतून आलेल्या चाकरमान्यांनमुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा वाढला आहे. जालन्यात लिक्विड ऑक्सिजन प्लॅन्टचे सुद्धा कोरोनाच्या रुग्णालयात सेटअप करण्यात आले आहे. त्याचसोबत कोरोनाबाधित रुग्णांना योग्य उपचार देण्यात येत असल्याचे ही टोपे यांनी म्हटले आहे.

दरम्यान, राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 5 लाखांच्या पार गेला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचारी सुद्धा कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. त्याचसोबत कोविड वॉरिअर्स सुद्धा आपले कर्तव्य बजावताना दिसून येत आहेत.(Healthcare Facilities: महाराष्ट्रात खेड्यापाड्यांत आणि दुर्गम भागापर्यंत उत्तम दर्जाच्या आरोग्य सेवा पोहोचविण्यास राज्य शासनाचे सर्वोच्च प्राधान्य- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे)

दरम्यान, जगभरासह भारतातही कोरोनाबाधित रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यामुळे कोरोना महामारीपासून स्वांतत्र्य मिळवण्यासाठी भारत आणखी एक युद्ध लढत असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी 74 व्या स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी म्हटले आहे. त्याचसोबत  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात 150 टेस्टिंग लॅब सुरू करण्यात आल्या आहेत. राज्यात विविध ठिकाणी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये उभारण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. महत्वाचे म्हणजे, महाराष्ट्रासह संपूर्ण भारत कोरोना संकटावर मात देण्यास लवकरच यशस्वी ठरेल, असा विश्वास उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केला.