Maharashtra Deputy Chief Minister Ajit Pawar (Photo Credit: X/AjitPawarSpeaks)

राज्य सरकार आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना परवडणारे जेवण मिळावे यासाठी 'शिवभोजन थाळी' (Shivbhojan Thali) आणि 'आनंदाचा शिदा' (Anandacha Sidha) योजना सुरू ठेवेल, अशी घोषणा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार () यांनी सोमवारी महाराष्ट्र विधानसभेतील लेखी उत्तरात केली. या योजनांची अंमलबजावणी सुरळीत व्हावी यासाठी या योजनांअंतर्गत विक्रेत्यांचे प्रलंबित देयके लवकरात लवकर मंजूर केली जातील, अशी हमीही पवार यांनी दिली. राज्य विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनात अजित पवार यांनी राज्याचा अर्थसंकल्प नुकताच सादर केला. या अर्थसंकल्पावर विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. त्यास उत्तर देताना उपमुख्यमंत्र्यांनी ही ग्वाही दिली आहे.

आनंदाचा शिदा योजना काय आहे?

दिवाळीदरम्यान 2022 मध्ये सुरू करण्यात आलेल्या आनंदाचा शिदा योजनेचे उद्दिष्ट भगव्या रेशनकार्ड असलेल्या कुटुंबांना सवलतीच्या दरात आवश्यक अन्नधान्य पुरवणे आहे. राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायदा, 2013 अंतर्गत नियमित अन्नधान्य वितरणाव्यतिरिक्त लाभार्थ्यांना फक्त 100 रुपयांत चार आवश्यक अन्नपदार्थ मिळतात. या योजनेत अंत्योदय अन्न योजना आणि प्राधान्य कुटुंबांचाही समावेश आहे आणि छत्रपती संभाजीनगर, अमरावती आणि वर्धा यासह 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील एपीएल शेतकरी (केशरी) कार्डधारकांपर्यंत विस्तारित आहे. (हेही वाचा, Maharashtra Liquor Shop Policy: गृहनिर्माण सोसाट्यांच्या व्यावसायिक गाळ्यांमध्ये बिअर, दारूची दुकानं सुरू करण्यासाठी सोसायटीची NOC आवश्यक - राज्य उत्पादन शुल्क मंत्री अजित पवारांचा नवा नियम)

शिवभोजन थाळी: गरिबांसाठी परवडणारे जेवण

2020 मध्ये सुरू करण्यात आलेली शिवभोजन थाळी योजना वंचितांना सवलतीच्या दरात पौष्टिक जेवण देण्यासाठी सुरू करण्यात आली. प्रत्येक शिवभोजन थाळीमध्ये खालील पदार्थांचा समावेश आहे:

  • 2 चपात्या
  • 1 वाटी शिजवलेल्या भाज्या
  • 1 वाटी डाळ
  • 1 वाटी तांदूळ

शिवभोजन थाळी ही योजना सध्या महाराष्ट्रातील 1,904 शिवभोजन केंद्रांद्वारे प्रतिदिन 2 लाख थाळ्या वितरित करते. कार्यक्षमता वाढवण्यासाठी, सरकारने केंद्रांच्या 100 मीटरच्या परिघात सीसीटीव्ही देखरेख ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. योजनेच्या स्थापनेपासून 27 मार्च 2024 पर्यंत लाभार्थ्यांना 18.83 कोटी शिवभोजन थाळी वाटण्यात आल्या आहेत.

दरम्यान, विधानसभा निवडणूक 2024 पूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील तत्कालीन सरकारने लाडकी बहीण योजना सुरु केली आणि राज्याच्या तिजोरीवर अतिरिक्त भार वाढला. ज्याचा परिणाम सरकारच्या महिला आणि बालविकास मंत्रालय वगळता इतर विभागांमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांवर मोठा परिणाम झाला. अनेक योजना रखडल्या तर काहींची पूर्तता करण्यासाठी निधीच उरणे कमी झाले. परिणामी ज्येष्ठ नागरिकांसाठीची योजना, ज्येष्ठ कलाकार आणि शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येणारी ठिबक सिंचन योजना देखील रखडली. परिणामी राज्य सरकारने अर्थसंकल्पात मोफत तत्तावर चालविल्या जाणाऱ्या अनेक योजनांमध्ये हात आकडता घेतला. ज्यामध्ये आनंदाचा शिधा आणि शिवभोजन थाळी आदींचाही समावेश होता. या पार्श्वभूमीवर विरोधकांनी केलेल्या टीकेला उत्तर देताना अजित पवार यांनी ग्वाही दिली आहे.