Coronavirus Outbreak (Photo Credits: PTI)

COVID19 Cases In Maharashtra: राज्यात कोरोना विषाणूने (Coronavirus) थैमान घातले आहे. आज महाराष्ट्रात 11 हजार 147 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर दिवसभरात 266 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे राज्यातील एकूण कोरोनाग्रस्तांचा आकडा 4 लाख 11 हजार 798 इतका झाला आहे. यातील 2 लाख 48 हजार 615 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. तसेच सध्या 1 लाख 48 हजार 150 रुग्णांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने (State Health Department) माहिती दिली आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 8860 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. राज्यात कोरोना रुग्णांचा बरे होण्याचा दर 60.37 टक्के आहे. तर कोरोना रुग्णांचा मृत्यू होण्याचे प्रमाण 3.58 टक्के इतका आहे. सध्या 9 लाखापेक्षा जास्त जणांना होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे. (हेही वाचा Coronavirus Update in India: भारतात मागील 24 तासांत COVID-19 रुग्णांच्या संख्येत आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ! कोरोना बाधितांची एकूण संख्या 15,83,792 वर)

दरम्यान, केंद्र सरकार आरोग्य मंत्रालयाने आज दिलेल्या ताज्या अपडेट्सनुसार, मागील 24 तासांत देशात 52 हजार 123 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 775 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे देशातील एकूण कोरोना बाधित रुग्णांची संख्या 15 लाख 83 हजार 792 इतकी झाली आहे. यातील 34 हजार 968 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. सध्या देशात 5 लाख 28 हजार 242 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.