महाराष्ट्र: राज्यातील COVID19 च्या रुग्णांचा रिकव्हरी रेट 55 टक्क्यांवर पोहचला, आतापर्यंत 1 लाख 65 हजार 663 रुग्ण कोरोनामुक्त
Coronavirus Outbreak | Representational Image | (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसागणिक वाढत चालला आहे. त्यामुळे कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. काल आलेल्या आकडेवारीनुसार राज्यात कोरोनाबाधितांचा आकडा 3 लाखांच्या पार गेला आहे. याच दरम्यान आता राज्यातील कोविड19 च्या रुग्णांचा रिकव्हरी रेट 55 टक्के इतका झाल्याची माहिती देण्यात आली आहे. आतापर्यंत 1 लाख 65 हजार 663 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.(मुंबईतील महापालिकेच्या 9 रुग्णालयांचे Non-COVID सेंटर्समध्ये रुपांतर करण्यात येणार)

कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी डॉक्टर्स, नर्स आणि वैद्यकिय कर्मचाऱ्यांकडून दिवसरात्र रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. तसेच कोविड वॉरिअर्स सुद्धा कोरोनाच्या या महासंकट काळात आपल्या जीवाची पर्वा न करता आपले कर्तव्य बजावत आहेत. तर राज्यातील मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पालघर आणि पुण्यात कोरोनाचे सर्वाधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे कोरोनाच्या हॉटस्पॉट ठिकाणी पुन्हा लॉकडाऊनचे आदेश स्थानिक प्रशासनाकडून दिले आहेत.(कोविड-19 संकटात Remdesivir चा काळा बाजार रोखण्यासाठी राज्य सरकारने खरेदी केल्या औषधाच्या 60,000 बाटल्या) 

दरम्यान आज राज्यात कोरोनाचे 9518 रुग्ण आढळून आले असून 258 जणांचा बळी गेला आहे. तर 3906 जणांची प्रकृती सुधारली असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 3,10,455 वर पोहचला असून त्यापैकी 1,69,569 रुग्णांना डिस्चार्ज दिला आहे. तर आतापर्यंत 11,854 जणांचा बळी गेल्याची माहिती आरोग्य विभागाकडून दिली आहे.