Maharashtra COVID19 Cases: महाराष्ट्रात दिवसभरात 16,429 नवे कोरोना रुग्ण, तर 423 जणांचा मृत्यू
Coronavirus | Representational Image | (Photo Credits: IANS)

Maharashtra COVID19 Cases: महाराष्ट्रात दिवसभरात 16,429 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तसेच 423 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. याशिवाय 14,922 जणांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून घरी सोडण्यात आलं आहे. त्यामुळे सध्या राज्यातील एकूण कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या 9,23,641 इतकी झाली आहे. आतापर्यंत 6,59,322 जणांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. परंतु, 27,027 जणांचा कोरोनामुळे बळी गेला आहे. सध्या राज्यात 2,36,934 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. यासंदर्भात आरोग्य मंत्रालयाने माहिती दिली आहे.

दरम्यान, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सामान्यांना दिलासा देण्यासाठी कोरोना चाचण्यांचे दर पुन्हा एकदा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला असून नव्या निर्णयानुसार राज्यात कोरोना चाचणी मागे 700 रुपये कमी करण्‍यात आले आहेत. आता कोरोनाची चाचणी अवघ्या 1200 रुपयांमध्ये होणार आहे. महिन्याभरापूर्वी चाचण्यांच्या दरांमध्ये सुधारणा करण्यात आली होती. त्यानंतर यासाठी नेमण्यात आलेल्या समितीने केलेल्या शिफारशीनुसार आता पुन्हा एकदा कमाल दर निश्चित करण्यात आले आहेत, असंदेखील टोपे यांनी सांगितलं आहे. (हेही वाचा - Dharavi Coronavirus Update: धारावीत आज 5 कोरोना संक्रमित रुग्ण; एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 2,824 वर पोहोचली)

नव्याने निश्चित केलेल्या दरानुसार कोरोना चाचण्यांसाठी 1200, 1600 आणि 2000 रुपये असे कमाल दर आकारण्यास खासगी प्रयोगशाळांना बंधनकारक करण्यात आले आहे. यापेक्षा अधिक दर खासगी प्रयोगशाळांना आकारता येणार नाहीत, असंही राजेश टोपे यांनी स्पष्ट केलं आहे.