No Network | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

राज्यात सुरु असलेल्या मुसळधार पावसाचा मोठा तडाखा व्होडाफोन-आयडिया (Maharashtra Rains Hit Vodafone-Idea) या दूरसंचार कंपनीला बसला आहे. गेले दोन तीन दिवस पुण्यात मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे व्होडाफोन-आयडिया (Vodafone-Idea) कंपनीच्या नेटवर्क सेवेत तांत्रिक बिघाड झाला आहे. दोन्ही कंपन्यांचे नेटवर्क कोलमडले (Vodafone-Idea Network Down) आहे. नेटवर्क कोलमडल्याने ग्राहकांना नसत्या मनस्तापाला सामोरे जावे लागले. ग्राहकांनी तक्रार केल्यानंतर कंपनीकडून मुसळधार पावसामुळे तांत्रिक बिघाड झाला असून, नेटवर्क कोलमडल्याचा खुलासा करण्यात आला आहे.

व्होडाफोन-आयडिया कंपनीचे नेटवर्क वापरणाऱ्या ग्राहकांना अडचणींना सामोरे जावे लागले. प्राप्त माहितीनुसार राज्यातील अनेक जिल्ह्यातील ग्राहकांना नेटवर्क कोलमडल्याचा फटका बसला. पाऊस कोसळत असताना ग्राहक जेव्हा फोन लावण्याचा प्रयत्न करत होते तेव्हा ग्राहकांना ‘नो नेटवर्क’चा सामना करावा लागला. 'नो नेटवर्क’ दाखवत असल्यामुळे ग्राहकांना फोन लावणे कठीण होऊन बसले होते. परिणामी संपर्क साधता येत नसल्याने ग्राह वैतागले. अखेर ग्राहकांनी ट्विटर आणि इतर सोशल प्लॅटफॉर्मवरुन कंपनीशी संपर्कसाधला. त्यानंतर कंपनीने नेटवर्क कोलमडल्याचा खुलासा केला. (हेही वाचा, Pune Rains Update: पुणे जिल्ह्यात मुसळधार पाऊस, शरद पवार यांची बारामती तुडूंब, अनेक घरांत पाणी शिरले, इंदापूरात 40 जणांचे प्राण वाचवले)

‘नो नेटवर्क’ दाखवत असल्यामुळे अनेक ग्राहकांना नेमकी काय समस्या झाली आहे हे कळत नव्हते. काही ग्राहकांना आपल्याच फोनमध्ये काही समस्या असल्याचे वाटले. त्यामुळे त्यांनी मोबाईल उघडून सीमकार्ड इजेक्ट करुन पुन्हा मोबाईलमध्ये बसवले. परंतू,तहीही नेटवर्क पकडत नसल्याचे ध्यानात येताच ग्राहकांनी कंपनीला ट्विटरवरुन संपर्क साधत संताप व्यक्त केला.

संपूर्ण महाराष्ट्रासह पुणे (Pune) जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत आहे. परतीचा पाऊस यंदा नेहमीच्या तुलनेत काहीसा अधिकच प्रसन्न झाला आहे. त्यामुळे नागरिकांवर पावसाला 'आता पुरे रे बाबा..' म्हणण्याची वेळ आली आहे. पुणे जिल्ह्यात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडतो आहे. तर काही ठिकाणी अतिवृष्ठी झाली आहे.

पुणे शहर परिसरात बुधवार रात्रीपासूनच दमदार पाऊस पाहायला मिळत आहे. बुधवारी रात्री, गुरुवारी दिवसभर आणि काल रात्रीसह आज सकाळीही दमदार पाऊस पाहायला मिळाल. या पावसामुळे शहरात सकल भागात पाणी साचले. रस्त्यांवरही पाणीच पाणी. नागरिकांच्या घरांमध्येही काही ठिकाणी पाणी शिरल्याचे पाहायला मिळाले.